कारल्याची चवीष्ट भाजी आणि पोळी | Karela bhaji with Chapati Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Karela bhaji with Chapati recipe in Marathi,कारल्याची चवीष्ट भाजी आणि पोळी, Shraddha Juwatkar
कारल्याची चवीष्ट भाजी आणि पोळीby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Karela bhaji with Chapati Recipe in Marathi

कारल्याची चवीष्ट भाजी आणि पोळी recipe

कारल्याची चवीष्ट भाजी आणि पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karela bhaji with Chapati Recipe in Marathi )

 • पाव किलो हिरवी कारली
 • 4 मोठे कांदे बारीक चिरून
 • 1 चमचा आले लसूण किसलेले
 • 1 चमचा मोहरी, जिरे,कढीपत्ता, लाल तिखट व हळद
 • चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
 • ओले खोबरे, 2 चमचे शेंगदाणे कूट व चिमूटभर गूळ
 • 2 मोठे चमचे तेल

कारल्याची चवीष्ट भाजी आणि पोळी | How to make Karela bhaji with Chapati Recipe in Marathi

 1. रात्री कारली धूवून पुसून मध्ये कापून बारीक चिरून घ्यावी. व एका भांड्यात ठेवून थोडे मीठ हळद व लिंबाचा रस घालून एकजीव करुन फिरॣज मध्ये ठेवावीत.
 2. सकाळी बाहेर काढून एका स्वछ पातळ कपडा घेऊन त्यात कारली ठेवून चांगले घट्ट पिळून सर्व पाणी काढावे
 3. एका कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे कढीपत्ता व चिरलेले आले लसूण घालावा त्यानंतर चिरलेली कारली घालून व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे
 4. कारली चांगली भाजून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा व मिरच्या घालून, कांदा लालसर होईपर्यंत भाजी परतावी.
 5. आता त्यात हळद व लाल तिखट घालून गूळ घालून व थोडे मीठ घालावे व झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढावी.
 6. शेवटी त्यात ओले खोबरे, शेंगदाण्याचा कूट व कोथिंबीर घालून एकदा चांगले परतून गॅस बंद करावा.
 7. हि भाजी अजिबात कडू लागत नाही

Reviews for Karela bhaji with Chapati Recipe in Marathi (0)