मिश्र पिठा चे लाडू | MULTIGRAIN LADOO Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MULTIGRAIN LADOO recipe in Marathi,मिश्र पिठा चे लाडू, जयश्री भवाळकर
मिश्र पिठा चे लाडूby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

मिश्र पिठा चे लाडू recipe

मिश्र पिठा चे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MULTIGRAIN LADOO Recipe in Marathi )

 • 1/2 कप मुगाच पिठ
 • 1/2  कप चण्या च पिठ/बेसन
 • 1/2 कप उडीद डाळी च पिठ
 • 2 कप साजूक तूप
 • 2 वाट्या साखर
 • 2 चमचा वेलची पावडर
 • 1 कप पाणी

मिश्र पिठा चे लाडू | How to make MULTIGRAIN LADOO Recipe in Marathi

 1. सगळी पिठ एकत्र करून मुठ्ठी बंद असे तुपाचे मोहन घाला अंदाजे 4-5 चमचे तूप लागेल.
 2. आता अगदी थोडं थोडं पाणी घालून पिठ मळून घ्या .
 3. ह्या पिठा चे छोटे छोटे  मुटकुळे बनवा.
 4. हे मुटकुळे तुपात गुलाबी तळून घ्या.
 5. आता हे मुटकुळे थंड झाल्यावर हातांनी कुस्करून घ्या आणि मिक्सर मधे बारीक वाटून घ्या.
 6. हे वाटलेले पिठ 2 चमचा तुपात पुन्हा थोडं परतून घ्या.
 7. एकी कडे पातेल्यात 2 कप साखरेत 1/2 कप पाणी घाला आणि साखर विरघळू  द्या ,हा कच्चा पाक झाला ह्याचे 2-3  चमचे पाक तैयार पिठात नीट मिक्स करा.
 8. आता उरलेल्या पाका चा गोळी बंद पाक करून पिठात नीट मिक्स करा.
 9. कच्चा पाक घातल्या मुळे गोळीबंद पाका ची काही गफलत होत नाही हवा तसा मऊ लाडू बनतो.
 10. 10.हे मिश्रण थोडं कोंबट असतानाच लाडू वळून घ्या वर एक काजू चा तुकडा सजावटी साठी लावा.
 11. पौष्टिक असे मिक्स पिठांचे लाडू तैयार आहेत.

My Tip:

पिठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

Reviews for MULTIGRAIN LADOO Recipe in Marathi (0)