वांग्याचे भरीत | Eggplant bharit Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Eggplant bharit recipe in Marathi,वांग्याचे भरीत, दिपाली सावंत
वांग्याचे भरीतby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Eggplant bharit Recipe in Marathi

वांग्याचे भरीत recipe

वांग्याचे भरीत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Eggplant bharit Recipe in Marathi )

 • 1 भरित वांगं
 • 2 कांदे बारीक चिरलेले
 • 1 टोमॅटो बारीक चिरलेला
 • 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
 • आलं लसूण किसलेलं
 • राई जीर हिंग कडीपत्ता कोथिंबीर
 • हळद लाल तिखट, गरम मसाला
 • शेंगदाण्याचे कूट
 • तेल व मीठ

वांग्याचे भरीत | How to make Eggplant bharit Recipe in Marathi

 1. भरताचं वांग धुऊन पुसून त्याला सुरीने उभ्या चिरा पाडाव्या व तेल लावून गॅस वर आलटून पालटून व्यवस्थित भाजुन घ्या
 2. 5 मिनिटांनी सुरी सहज आत जाईल एवढ भाजा. थंड झाल्यावर साल काढून बारीक चिरून घ्यावा
 3. एका कढईत तेल गरम करून त्यावर फोडणी करा. राई, जीर, हिंग, कडीपत्ता, कांदा, आलं लसूण, हिरव्या मिरच्या , कोथिंबीर व हळद घालून चांगले परतून घ्या
 4. बारिक चिरलेला टोमॅटो घाला
 5. थोडा लाल तिखट व गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा,
 6. तेल सुटल्यावर त्यात वांग, मिठ व शेंगदाण्याचे कूट घालून चांगले परतून घ्यावे झाकण लावून 5 मिनिटे शिजू द्या
 7. तेल सुटल्यावर त्यात पुन्हा कोथिंबीर घालून चांगले ढवळून सर्व्ह करा

My Tip:

फोडणी त कोथिंबीर घालून मस्त चव येते,

Reviews for Eggplant bharit Recipe in Marathi (0)