मुख्यपृष्ठ / पाककृती / गवारीची सोपी भाजी

Photo of Gavarichi sopi bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
777
1
0.0(0)
0

गवारीची सोपी भाजी

Jul-29-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवारीची सोपी भाजी कृती बद्दल

गवारीची सोपी भाजी आज आपण बनविणार आहोत तश्या भाज्या खूप प्रकारे बनवता येतात पाहूयात आपण गवारीची भाजी कशी केली आहे

रेसपी टैग

  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गवार २५० ग्रॅम
  2. कांदा १ मोठा
  3. टोमॅटो १ मध्यम
  4. आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  5. हिरची मिरची पेस्ट १/२ लहान चमचा
  6. कोथिंबीर १ मोठं चमचा
  7. तेल २ मोठे चमचे
  8. जिरं १/२ चमचा
  9. मोहरी १/३ लहान चमचा
  10. कडीपत्ता ८ ते १०
  11. हिंग १/२ लहान चमचा
  12. मीठ स्वादानुसार
  13. हळद १/२ लहान चमचा
  14. गरम मसाला १ लहान चमचा
  15. लाल तिखट १ लहान चमचा

सूचना

  1. गवारीच्या शेंगा निवडून तोडू त्या धुवून घ्या
  2. आता एका टोपात घालून त्यात पुरेसं पाणी घाला त्यात मोटज घालून गवार उकळवून घ्या
  3. अर्धे शिजले की गॅस बंद करून त्यातले गवार चाळणीत काढून घ्या
  4. आता कढईत तेल घालून उकळलेल्या गवार भाजून घ्या भाजून झाल्यावर ताटात काढून ठेवा
  5. त्याच कढईत तेल घाला
  6. जिरं, मोहरी, कडीपत्ता घाला तडतडली की त्यात हिंग घाला
  7. आता बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला व चांगलं परतवून घ्या
  8. आता आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, घालून व्यवस्थित परतवून घ्या
  9. चवीनुसार मिठव हळद घालून घ्या
  10. भाजलेल्या मसल्याना तेल सुटलं की त्यात मसाले घाला व पुन्हा व्यवस्थित भाजून घ्या
  11. चिरलेली कोथिंबीर घाला
  12. थोडंस मसाल्यात पाणी शिंपडा मसाला एकजीव करून घ्या
  13. आता भाजलेली गवार मसाल्यात घालून एकत्र करून घ्या
  14. ५ ते ६ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या
  15. शिजलेल्या गरमा गरम भाजीवर कोथिंबीर घाला व गॅस बंद करा
  16. तयार भाजी पोळी , भाकरी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर