मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाची भाजी

Photo of phansachi bhaji by Seema jambhule at BetterButter
329
1
0(0)
0

फणसाची भाजी

Jul-29-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाची भाजी कृती बद्दल

भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2 कि कच्चा फणस
  2. मध्यम आकाराचे कांदे तीन-चार
  3. लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच
  4. सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल मिरच्या सात-आठ
  5. तीळ पन्नास ग्राम , मेथी दाणे अर्धा चमचा
  6. धने-जीऱ्याची पूड दोन चमचे
  7. काळा मसाला दोन चमचे
  8. कोथिंबीर अर्धी वाटी
  9. अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त तेल
  10. मोहरी पाव चमचा
  11. हळद पाव चमचा
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. फणस चिरण हे अतिशय कष्टाचं आणि किचकट काम असतं.  हाताला व विळीला गोडतेल लावून फणस चिरावा .
  2. तीन कांदे भाजून घ्यावे .  सुकं खोबरं , तीळ भाजून घ्यावेत .  ग्रेव्हीसाठी मिक्सरवर तीळ-खोबरं , सुक्या मिरच्या , कांदे लसूण , आलं , धने-जिरे , मेथी दाणे वाटून घ्यावे .
  3. फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला परतावा .  मसाल्याला तेल सुटू लागलं की चिरलेला फणस घालावा .
  4. फोडणीतच हळद घालावी .  भाजीला उकळी फुटली की काळा मसाला घालावा .  भाजी चांगली शिजवून घ्यावी
  5. भाजी शिजतानाच भरपूर कोथिंबीर त्यात घालावी म्हणजे कोथिंबिरीचा स्वाद त्यात चांगला उतरतो .  चवीपुरत मीठ घालावं .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर