साबूदाण्याची ताकात भिजवलेली खिचडी | Buttermilk soaked Sabudana khichadi Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Buttermilk soaked Sabudana khichadi recipe in Marathi,साबूदाण्याची ताकात भिजवलेली खिचडी, Archana Chaudhari
साबूदाण्याची ताकात भिजवलेली खिचडीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  6

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Buttermilk soaked Sabudana khichadi Recipe in Marathi

साबूदाण्याची ताकात भिजवलेली खिचडी recipe

साबूदाण्याची ताकात भिजवलेली खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Buttermilk soaked Sabudana khichadi Recipe in Marathi )

 • साबुदाणा ३ कप
 • ताक २ कप
 • हिरवी मिरची ६
 • बटाटा २ मध्यम
 • शेंगदाणे कूट १ १/२ कप (साले काढून कूट केलेले)
 • जिरे १ टीस्पून
 • तूप २ टेबलस्पून
 • मीठ चवीनुसार

साबूदाण्याची ताकात भिजवलेली खिचडी | How to make Buttermilk soaked Sabudana khichadi Recipe in Marathi

 1. साबुदाणा स्वच्छ धुऊन ताक आणि थोडे पाणी टाकून ६ तास भिजत ठेवावा.
 2. साबुदाणा भिजल्यावर त्यात दाण्याचे कूट,मीठ टाकावे.
 3. कढईत तूप तापायला ठेवा.
 4. बटाट्याचे साले काढून बारीक काप करून वरील तुपात तळून घ्या.
 5. तळलेले बटाट्याचे काप वरील भिजलेल्या साबुदाण्यावर टाका.
 6. आता त्याच तुपात जिरे ,हिरवी मिरची टाका.
 7. परतून झाल्यावर साबुदाण्याचे मिश्रण टाकावे.
 8. छान १ वाफ आली की गॅस बंद करा.
 9. गरम गरम ताकात भिजवलेला साबुदाण्याची खिचडी तयार आहे.

My Tip:

तुम्ही थोडी साखर घालू शकता.

Reviews for Buttermilk soaked Sabudana khichadi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo