उपवासाची शेव बटाटा पुरी | UPVAS SHEV PURI Recipe in Marathi

प्रेषक Aditi Bhave  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • UPVAS SHEV PURI recipe in Marathi,उपवासाची शेव बटाटा पुरी, Aditi Bhave
उपवासाची शेव बटाटा पुरीby Aditi Bhave
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

उपवासाची शेव बटाटा पुरी recipe

उपवासाची शेव बटाटा पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPVAS SHEV PURI Recipe in Marathi )

 • राजगिरा पीठ- 2 वाटी
 • वरी पिठ - 1 वाटी
 • तूप तळण्यासाठी
 • तिखट चवीनुसार
 • मीठ चवीनुसार
 • उकडलेला बटाटा -2
 • चिंच - अर्धी वाटी
 • गूळ - 1 वाटी बारीक करून
 • जिरे - 1 चमचा
 • जिरा पावडर - 2 चमचे

उपवासाची शेव बटाटा पुरी | How to make UPVAS SHEV PURI Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून घ्यावे. राजगिरा व वरी पिठात 2 चमचे तुपाचे मोहन घालून मीठ व तिखट घाला . हे पीठ मळून घ्या . लहान लहान पुऱ्या करून त्या तळून घ्या. पुऱ्या फुगायला नकोत. म्हणून त्याला टोचे मारून मग तळा. आता उकडलेला बटाटा मॅश करून त्यात मीठ तिखट घाला. पुरी प्लेट मध्ये ठेवून त्यावर मॅश बटाटा ठेवा. मग चिंचेची चटणी , मग बटाटा शेव किंवा चिवडा , मग जीरा पावडर . असे सगळे घालून त्यावर हवे असल्यास परत तिखट भुरभुरावे. मस्त उपवास special चटपटीत शेव बटाटा पुरी तयार. चिंचेची चटणी - चिंच , गूळ , जिरं, एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून शिजवून घ्यावे. मग मीठ घालून मिक्सर मधून बारीक करावे.

My Tip:

हिरवी चटणी आवडत असल्यास घालावी

Reviews for UPVAS SHEV PURI Recipe in Marathi (0)