उपवासाची बर्फी | Barfi in Shingada Flour Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Barfi in Shingada Flour recipe in Marathi,उपवासाची बर्फी, Bharti Kharote
उपवासाची बर्फीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  59

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

उपवासाची बर्फी recipe

उपवासाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Barfi in Shingada Flour Recipe in Marathi )

 • एक कप रूचिराचे शिंगाडा पीठ
 • दोन कप दूध
 • एक कप साजूक तूप. .
 • पाऊण कप गुळ खिसून
 • पाव चमचा वेलची पूड /जायफळ
 • ड्रायफ्रूटस दोन चमचे

उपवासाची बर्फी | How to make Barfi in Shingada Flour Recipe in Marathi

 1. गॅस वर कढाई तापत ठेवून त्यात तूप घातले. .
 2. रूचिरा शिंगाडा पीठ चाळून घेतले. .
 3. ते पीठ कढाई मध्ये टाकून 10/15 मी.तुपात खमंग भाजून घेतले. .
 4. त्यात गुळ आणि वेलची पूड घालून चांगल हलवून घेतले. .
 5. नंतर त्यात दूध घालून चांगल शिजवून घेतले. .
 6. तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेतले. .
 7. कढई मधून शिजवलेला गोळा काढून ताटावर थापून घ्या. ..
 8. ड्रायफ्रूटस ने सजावट केली. ..
 9. अर्धा तास फ्रीझ मधे सेट होण्यासाठी ठेवून द्या. ...नंतर सूरीने वड्या कापून घेतल्या. ..
 10. परत अर्धा तास फ्रीझ मधे सेट होण्यास ठेवले. .

My Tip:

नवराञी स्पेशल उपवासाचा गोड पदार्थ..गुळ दूध कमी जास्त घालू शकता. .पातळ झाली तर सेट होण्यास जास्त वेळ लागतो...

Reviews for Barfi in Shingada Flour Recipe in Marathi (0)