सुरणाची खिचडी | Suran khichdi Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Suran khichdi recipe in Marathi,सुरणाची खिचडी, Manasvi Pawar
सुरणाची खिचडीby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

सुरणाची खिचडी recipe

सुरणाची खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Suran khichdi Recipe in Marathi )

 • पाव किलो सुरण
 • पाव वाटी दाण्याचा कूट जरा जाडसर घ्यावे
 • १/२ चमचा जिरे
 • १/२ तीळ
 • तूप फोडणीसाठी
 • तीन हिरव्या मिरच्या चिरून
 • चार चमचे ओल खोबर
 • कोथिंबीर सजावटीसाठी
 • मीठ चवीनुसार
 • साखर १/२ चमचा
 • १/२ लिंबाचा रस

सुरणाची खिचडी | How to make Suran khichdi Recipe in Marathi

 1. सुरण सोलून घ्या आणि किसणीवर किसून घ्या
 2. किसल्यावर सुरण १०-१५ मिनिटे मिठाच्या पाण्यात राहू द्या
 3. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा
 4. जिरे तीळ तडतडल्यावर मिरच्या आणिशेंगदाण्याची जाडसर भरड घालून थोडावेळ परतावे
 5. आता सुरण पाण्यातून काढून पिळून घ्यावे आणि थोडावेळ परतून घ्यावे
 6. एक वाफ काढावी मग त्यामध्ये ओलं खोबरं मीठ घालून पुन्हा मिक्स करून एक वाफ काढावी
 7. आता साखर आणि लिंबाचा रस घालून छान मिक्स करावे
 8. कोथिंबीर घालून सजावट करावी
 9. दह्याबरोबर खाण्यासाठी द्या

My Tip:

सूरण चिरताना हाताला तेल लावावे म्हणजे खाज सूटणार नाही

Reviews for Suran khichdi Recipe in Marathi (0)