फराळी समोसा | Pharali Samosa Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pharali Samosa recipe in Marathi,फराळी समोसा, Sujata Hande-Parab
फराळी समोसाby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

फराळी समोसा recipe

फराळी समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pharali Samosa Recipe in Marathi )

  • समोसा आवरणासाठी • अमरिंथ किंवा राजगिरा पीठ – १ कप •
  • बटाटा उकडलेला आणि किसलेला - १ मध्यम
  • मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
  • साखर - १/२ टीस्पून
  • आमचूर पावडर – ¼ टीस्पून किंवा लिंबू रस - १ टीस्पून
  • जिरा - ¼ टीस्पून
  • तेल - १ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप फ्रयिंग
  • पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ कप किंवा गरजेनुसार
  • सारणासाठी - बटाटा उकडलेला आणि छोट्या तुकड्यात कापलेला - २ मध्यम.
  • हिरवी मिरची जाड वाटलेली - १ १/२ टेबलस्पून •
  • जिरा -१ टीस्पून
  • भाजलेले शेंगदाणे भरडलेले - ३ टेबलस्पून
  • काजू भरडलेले - 1 टेबलस्पून
  • मनुका – १ टीस्पून
  • किसलेला ताजा नारळ - १/४ कप
  • लिंबू रस - १ टीस्पून
  • ताजा आले पेस्ट - २ टीस्पून
  • मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
  • तेल - १ टेबलस्पून 
  • सर्विंग साठी - फ्रेश खोबरे चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी

फराळी समोसा | How to make Pharali Samosa Recipe in Marathi

  1. सारणासाठी - पॅन मध्ये तेल गरम करा. जिरे टाकून चांगले तडतडू द्या.
  2. कमी गॅसवर, हिरवी मिरची आणि आले पेस्ट टाकून चांगले भाजून घ्या.
  3. नंतर बारीक तुकडे केलेले बटाटे टाकून चांगले परतून घ्या.
  4. भाजून भरडलेले शेंगदाणे, लिंबाचा रस, मीठ, मनुका, काजू तुकडे घालून एकजीव करून घ्या.
  5. शेवटी किसलेले ताजे खोबरे घालून परतून घ्या.
  6. सामोसा - परातीत किंवा बाउल मध्ये राजगिरा पीठ घ्या.
  7. त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण ब्रेडकरुम्बस सारखे होईल.
  8. त्यामध्ये जिरे, साखर, मीठ, आमचूर पावडर, किसलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करून घ्या.लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले आणि घट्ट पीठ मळून घ्या.२०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
  9. नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
  10. पोळपाटावर प्लास्टिक किंवा मलमलच्या कापडयाला पाणी लावून छोट्या जाड पुऱ्या लाटून घ्या.
  11. पुरीचे अर्धा वर्तुळ कापा. कोण करून सगळ्या बाजू व्यवस्थित जोडून घ्या
  12. केलेले बटाट्याचे सारण कोनात व्यवस्तीत भरून, सगळ्या बाजू एकत्र आणून जोडून घ्या.
  13. अशाप्रकारे सगळे सामोसे बनवून घ्या.
  14. एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेलले सामोसे व्यवस्तीत सगळ्या बाजूने लालसर आणि कुरकुरीत होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  15. ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

Reviews for Pharali Samosa Recipe in Marathi (0)