मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पनीर कटलेट्स

Photo of Potato Paneer Cutlets by Sujata Hande-Parab at BetterButter
608
6
0.0(0)
0

बटाटा पनीर कटलेट्स

Aug-08-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पनीर कटलेट्स कृती बद्दल

नवरात्री मध्ये उपवास असला कि विविध प्रकारच्या रेसिपी करून पाहव्यास्या वाटतात . त्यातीलच एक रेसिपी आज मी शेअर करत आहे. खुपच सोपी, थोडे पदार्थ वापरून लवकर तयार होणारी आणि चविष्ट अशी डिश आहे. उपवास किंवा नाश्त्याला हि डिश बनवू शकतो. उपवास नसेल तर आणखी काही एक्सट्रा साहित्य वापरले तरी चालते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर किसलेले - १ /२ कप •
  2. बटाटा उकडलेला आणि किसलेला - १ कप •
  3. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार •
  4. साखर - १/२ टीस्पून •
  5. हिरवी मिरची जाडसर वाटलेली - १ किंवा २ टेबलस्पून •
  6. भाजलेले जिरे - १/२ टीस्पून •
  7. तेल - २ -३ टेबलस्पून फ्रयिंग •
  8. सर्विंग साठी गोड दही - १/२ कप
  9. गार्निशिंग - गोड दही, तृटी फ्रुटी

सूचना

  1. मिक्सरमध्ये बटाटा उकडलेला आणि किसलेला, पनीर टाकुन वाटून घ्या.
  2. त्यामध्ये साखर, मीठ, भाजलेले जिरे, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून व्यवस्तिथ एकजीव करून घ्या.
  3. पॅन वर तेल टाकून व्यवस्तिथ पसरून घ्या.
  4. छोटे गोल कटलेट्स करून पॅन वर दोनी बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  5. गरम गरम गोड दह्याबरोबर सर्वे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर