कलाकंद | Kalakand Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kalakand recipe in Marathi,कलाकंद, seema Nadkarni
कलाकंदby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

कलाकंद recipe

कलाकंद बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kalakand Recipe in Marathi )

 • 1 लिटर अमुल गोल्ड दूध
 • 1/2 कप साखर
 • 1-2 चमचा लिंबाचा रस
 • 2 चमचा ड्राय फ्रूट पावडर
 • 1 चमचा तूप
 • 1 टी स्पून वेलची पावडर

कलाकंद | How to make Kalakand Recipe in Marathi

 1. दूधाला गरम करून घ्या. त्यात लिंबू चा रस घालून दूध फाडून घ्या.
 2. एका चाळणी नी हे मिश्रण गाळून घ्यावे, थंड पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले की त्यात लिंबाचा वास येत नाही.
 3. हे मिश्रण एका रूमालात 1 तास घट्ट बांधून ठेवा, म्हणजे सगळ पाणी निघून जाईल.
 4. 1 तासात पनीर तयार होईल. या पनीर ला खिसुन एका कढईत घेऊन व्यवस्थित परतून घ्या.
 5. त्यात साखर घालून एकत्र करावे. 1-2 मिनिटांनी त्यात ड्राय फ्रूट पावडर व वेलची पावडर घालून एकत्र करून घ्यावे. आता तूप घालून व्यवस्थित हलवून या मिश्रणाला एका तूप लावलेल्या ताटात काढून घ्या.
 6. वरून ड्राय फ्रूट पावडर व केसर नी सजावट करावी.

Reviews for Kalakand Recipe in Marathi (0)