फराळी स्वीट बाइट्स | Pharali Sweet Bites Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  13th Aug 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Pharali Sweet Bites recipe in Marathi,फराळी स्वीट बाइट्स, Sujata Hande-Parab
फराळी स्वीट बाइट्सby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

फराळी स्वीट बाइट्स recipe

फराळी स्वीट बाइट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pharali Sweet Bites Recipe in Marathi )

 • भाजलेले बदाम - १२-१४
 • बेदाणा - २ टेबलस्पून 
 • खजूर (बिया काढलेले ) - ७-८(काळे)
 • भाजलेले शेंगदाणे - १/४ वाटी(साले काढून घेतलेली)
 • कंडेन्सड दूध - ३-४ टेबलस्पून 
 • जायफळ पूड - १/४ टीस्पून 
 • हिरव्या वेलची पूड - १/२ टीस्पून 
 • किसलेले पनीर - १/४ वाटी
 • ताजे खवलेले किंवा किसलेला नारळ - ३/४ वाटी

फराळी स्वीट बाइट्स | How to make Pharali Sweet Bites Recipe in Marathi

 1. गरम पॅनवर किसलेले खोबरे कमी आचेवर २-३ मिनिटे भाजून घ्यावे.
 2. वेलची, जायफळ पावडर घालावी. मिसळा.
 3. कंडेन्सड दूध घाला.एकत्रित होईपर्यंत मिसळा. एक वाडग्यात किसलेले पनीर आणि किसलेले खोबरे-कंडेन्सड दूध मिश्रण घेऊन चांगले मिक्स करून घ्या घ्या आणि बाजूला ठेवा.
 4. एका ब्लेंडरमध्ये भाजलेले बदाम, शेंगदाणे, मनुका, खजूर वाटून घ्यावे. त्यात वेलचीपूड एक चिमूटभर घालावी. चांगले मिक्स करावे
 5. १ १/२ इंच सुका मेवा मिश्रणाचे गोळे बनवा.
 6. लिंबूच्या आकाराचे नारळ-पनीर मिश्रणाचे गोळे बनवून त्याला थोडे बोटानी थापून घेऊन छोटी वाटी किंवा लाटी बनवून घ्या.
 7. तयार केलेले सुका मेवा मिश्रणाचे बॉल्स त्यामध्ये बसवून सगळ्या बाजूनी व्यवस्तिथ गोलाकार करून लाडू सारखा आकार द्या.
 8. उर्वरीत मिश्रणासह प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
 9. ते हवाबंद डब्यात घालून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. १ किंवा २ दिवस चांगले राहतात.

Reviews for Pharali Sweet Bites Recipe in Marathi (1)

Teju Auti3 months ago

Prsentation all receipes good and delicious..
Reply