स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स | Stuffed Barnyard Millet Cutlets Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Stuffed Barnyard Millet Cutlets recipe in Marathi,स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स, Sujata Hande-Parab
स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्सby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स recipe

स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Barnyard Millet Cutlets Recipe in Marathi )

  • जिरा वरी भात- १ कप
  • बटाटा उकडलेला आणि किसलेला - ३/४ कप 
  • मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
  • साखर - १/२ टीस्पून
  • लिंबू रस - १/२ टीस्पून
  • फोडणीसाठी - जिरे - १/४ टीस्पून अगदी थोडे 
  • हिरवी मिरची जाडसर वाटलेली - १ किंवा २ टेबलस्पून
  • किसलेले ताजे आले - १ टेबलस्पून (जाडसर वाटून घेणे)
  • जिरा पूड - १/२ टीस्पून 
  • तेल/तूप - ३-४ टेबलस्पून फ्रयिंग + १ टीस्पून फोडणीसाठी
  • सर्विंग साठी - गोड दही ,किंवा खोबरे चटणी
  • गार्निशिंग - डाळिंबाचे दाणे 

स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स | How to make Stuffed Barnyard Millet Cutlets Recipe in Marathi

  1. एका कढईत किंवा पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. त्यात जिरे टाकून त्याला तडतडू द्या.
  2. त्यात हिरव्या मिरचीची, आल्याची जाड चटणी किंवा भरड टाकून चांगले कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्या.
  3. त्यात जिरे पूड टाकून ढवळा.
  4. त्यात उकडून कुस्करलेला बटाटा, सैंधव मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
  5. लिंबू रस टाकून चांगले मिक्स करून घ्या. गॅस बंद करा.
  6. कटलेट्स - शिजवलेला वारी भात चांगला कुस्करून त्याचे सामान आकाराचे गोळे बनवा.
  7. त्यांना डिस्क किंवा छोटी लाटी सारखा आकार देऊन त्यात १ १/२ टीस्पून बनवलेले बटाट्याचे सारण घालून सगळ्या बाजूनी व्यवस्तिथ बंद करून घ्या.
  8. पॅन वर तेल टाकून व्यवस्तिथ पसरून घ्या.
  9. छोटे गोल कटलेट्स करून पॅन वर दोनी बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
  10. गरम गरम गोड दह्याबरोबर सर्वे करा.

Reviews for Stuffed Barnyard Millet Cutlets Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती