उपासाचा मंचूरियन पूलाव | Manchurian Pulav Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Manchurian Pulav recipe in Marathi,उपासाचा मंचूरियन पूलाव, Vaishali Joshi
उपासाचा मंचूरियन पूलावby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

उपासाचा मंचूरियन पूलाव recipe

उपासाचा मंचूरियन पूलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Manchurian Pulav Recipe in Marathi )

 • मंचूरियन साठी - गाजर किस १ वाटी
 • बटाटा किस १ वाटी
 • भावनगरी मिरच्या २ (बारीक़ चिरुन )
 • राजगिरा पीठ १ वाटी
 • मीठ
 • ओवा १/४ चमचा
 • आल मिर्ची जीर ठेचा १ चमचा
 • तिखट १ छोटा चमचा
 • १ लिंबाचा रस
 • शेंगदाणे तेल
 • पुलाव करीता - वरी चे तांदुळ ( भगर )१ वाटी
 • जीर
 • आल मिर्ची ठेचा २ चमचे
 • गाजर तुकडे
 • आंबट दही १ वाटी
 • मीठ
 • काजू
 • वेलची
 • लवंग
 • पाणी
 • शेंगदाणे तेल
 • साजुक तूप

उपासाचा मंचूरियन पूलाव | How to make Manchurian Pulav Recipe in Marathi

 1. एक बाऊल मधे गाजर किस , बटाटा किस ,बारीक़ चिरलेली भावनगरी मिरच्या , राजगिरा पीठ ,ओवा, तिखट , मीठ ,आल मिर्ची जीर ठेचा ,लिंबाचा रस आणि २ चमचे शेंगदाणे तेल घालून एकत्र करा आणि घट्ट भिजवून घ्या
 2. भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून मंचूरियन करून ठेवा
 3. मंचूरियन शेंगदाणे तेलात तळून घ्या
 4. सगळे तळून घेवुन बाजूला ठेवा
 5. वरिचे तांदुळ धुवुन घ्या गैस वर कढईत तेल घालून जीर लवंग वेलची काजू फोडनी ला घाला
 6. त्यात गाजर तुकडे घालून परता व धुतलेले वरिचे तांदुळ घालून थोड़े परतून घ्या आल मिर्ची ठेचा घाला ,आंबट दही घाला परतून घ्या , उकळते पाणी घालून परता आणि पुलावला वाफ येऊ द्या
 7. नंतर मीठ टाकुन परतून घ्या आणि मंचूरियन घालून पुन्हा परता आणि साजुक तूप साइडने सोडा व एक वाफ येऊ द्या
 8. बस गरमा गरम मंचूरियन पुलाव सर्व्ह करा ताक किंवा आमटी बरोबर

Reviews for Manchurian Pulav Recipe in Marathi (0)