स्पायसी राईस केक | Spaicy Rice Cake Recipe in Marathi

  प्रेषक Vaishali Joshi  |  25th Aug 2018  |  
  0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Spaicy Rice Cake by Vaishali Joshi at BetterButter
  स्पायसी राईस केकby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

   8

   तास
  • बनवण्यासाठी वेळ

   25

   मि.
  • किती जणांसाठी

   2

   माणसांसाठी

  3

  0

  स्पायसी राईस केक

  स्पायसी राईस केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spaicy Rice Cake Recipe in Marathi )

  • इडली रवा २ कप
  • ड्राय यीस्ट १ चमचा
  • साखर १ चमचा
  • शेंगदाणे भरड १ मोठा चमचा
  • डेसीकेटेड कोकोनट ३ मोठे चमचे
  • मीठ
  • चिली फ्लेक्क्स १ चमचा
  • जीर
  • तिखट
  • आंबट दही १/२ कप

  स्पायसी राईस केक | How to make Spaicy Rice Cake Recipe in Marathi

  1. गरम पाणी आणि साखरेच्या मिश्रणात यीस्ट घालून फुगवून घ्या
  2. इडली रवा , फुगवलेले यीस्ट , खोब्रा किस आणि दही घालून एकत्र करून लागेल तेवढे पाणी घालून साधारण पणे ८ तास घोळ भिजवून ठेवा
  3. केक करायला घेताना त्यात भाजलेले शेंगदाणे भरड , चिली फ्लेक्स , मीठ टाका मिक्स करून बैटर करून घ्या
  4. कुकरच्या एका पसरट भांडयाला तेल लावा त्यावर जीर आणि तिखट भुरभुरवा आणि केक चे बैटर घालून भांड थोड हलकेच खाली आपटा म्हणजे आत एयर न जमता केक समान फुगेल
  5. २० मिनिट कुकर मधे शिटी न लावता उकडून घ्या
  6. थंड झाल्यावर कापून आवडीच्या डीप सोबत खायला द्या

  Reviews for Spaicy Rice Cake Recipe in Marathi (0)