कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रंची हेल्दी चंक्स

Photo of Crunchy Healthy Chunks by Archana Chaudhari at BetterButter
0
1
0(0)
0

क्रंची हेल्दी चंक्स

Aug-29-2018
Archana Chaudhari
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रंची हेल्दी चंक्स कृती बद्दल

अतिशय आरोग्यदायी...चवीला छान..आणि पटकन होणारा हा पदार्थ. इथे मी गुळाचे प्रमाण माझ्याप्रमाणे घेतले आहे,तुम्ही बनवितांना गुळाचे प्रमाण वाढवू शकता.

रेसपी टैग

  • सोपी
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. फुटण्याची डाळ १/२ कप खरपूस भाजून घेतलेली
  2. शेंगदाणे १/२ कप खरपूस भाजून साले काढून १/२ तुकडे केलेले
  3. खोबरे १/२ कप खरपूस भाजून घेतलेले
  4. गूळ १ कप आणि १/४ कप
  5. तूप १ टीस्पून

सूचना

  1. सगळे साहित्य तयार ठेवा.
  2. एका कढईत तूप गरम करून त्यात गूळ टाका.
  3. गूळ छान वितळू द्या.
  4. वितळलेल्या गुळामध्ये भाजलेली फुटण्याची डाळ,भाजलेले खोबरे,भाजलेले शेंगदाणे घाला.
  5. एका भांड्याला तुपाचा हात लावून ग्रीस करून घ्या.
  6. मिश्रण एकजीव होईपर्यंत पटापट एकत्र करा.
  7. वरील मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात टाकून छान एकसारखे पसरवून घ्या.
  8. १० मिनिटांनंतर गार झाल्यावर तुकडे तोडून हवाबंद डब्यात भरून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर