Photo of Walache Birade by SUCHITA WADEKAR at BetterButter
1229
2
2.0(0)
0

Walache Birade

Sep-01-2018
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● पाव किलो मोड आलेले वाल
  2. ● 2 मध्यम आकाराचे कांदे
  3. ● 1 छोटा टोमॅटो
  4. ● 1 छोटा चमचा मोहरी
  5. ● 4 ते 5 कढीपत्त्याची पाने
  6. ● 7-8 पाकळ्या लसूण, आले
  7. ● 1 वाटी ओला खोवलेला नारळ
  8. ● 3-4 पळ्या तेल
  9. ● हिंग+हळद
  10. ● कोथिंबीर
  11. ● चवीपुरते मीठ
  12. ● 1 चमचा काळा मसाला
  13. ● 2 चमचे लाल तिखट

सूचना

  1. 1. प्रथम एक कांदा, टोमॅटो आणि लसूण मिक्सरला बारीक करून घ्यावे.
  2. 2. वालाच्या डाळींब्या स्वच्छ धुऊन त्याला हे मिश्रण चोळावे (मिक्स करावे).
  3. 3. यानंतर एका कढईत थोड्याशा तेलावर एक कांदा परतून घ्यावा.
  4. 4. तसेच लसूण आणि आलेही परतून घ्यावे.
  5. 5. यानंतर ओला नारळही परतून घ्यावा व कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्सरला फिरवून त्याचे बारीक वाटण करावे.
  6. 6. एका भांड्यामध्ये ३ ते ४ पळ्या तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा.
  7. 7. आणि कांदा, टोमॅटो, लसूण चोळलेल्या डाळींब्या घालाव्यात.
  8. 8. थोडे परतल्यावर त्यात काळा मसाला आणि लालतिखट घालावे. लालतिखट थोडे जास्त घालावे.
  9. 9. हे मिश्रण चांगले परतून थोडे पाणी घालून दोन उकळ्या आल्यावर बारीक गॅसवर डाळींब्या शिजू द्याव्यात.
  10. 10. डाळींब्या शिजल्या की यात मिक्सरला बारीक केलेले वाटण घालावे, आवश्यक वाटले तर अजून थोडे पाणी घालावे आणि मीठ घालून बारीक गॅसवर ठेवून द्यावे. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा.
  11. 11. आपले वालाचे बिरडे तय्यार ! पोळी, भात आणि लिंबासोबत सर्व्ह करा वालाचं बिरडं !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर