गूळ पोळी | GULPOLI Recipe in Marathi

प्रेषक Deepali Khillare  |  3rd Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of GULPOLI by Deepali Khillare at BetterButter
गूळ पोळीby Deepali Khillare
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

गूळ पोळी recipe

गूळ पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make GULPOLI Recipe in Marathi )

 • पिवळा गूळ अर्धा किलो किसून (चिकीचा गूळ वापरू नये.)
 • तीळ भाजून पूड अर्धी वाटी
 • डाळीचे पीठ एक वाटी
 • वेलची पूड पाव चमचा
 • तेल अर्धी वाटी

गूळ पोळी | How to make GULPOLI Recipe in Marathi

 1. 1.किसणीला तेलाचा हात लावून गुळ किसून घ्यावा. गूळ किसला की खडा राहात नाही व पोळी फुटत नाही. टीप- गुळाची पोळी करताना गुळ व पोळीचा म्हणजेच कणकेचा घट्टपणा सारखाच असला पाहिजे गूळ खूप घट्ट व कणिक सेैलसर असल्यास गूळ बाहेर येतो.
 2. 2.डाळीचे पीठ तेलावर मंद गॅसवर बदामी भाजावेे.
 3. 3.किसलेल्या गुळात गार डाळीचे पीठ,तिळपूड ,वेलची पूड घालावी एकत्र करुन गूळ एकजीव करावा. टीप-आवडत असल्यास सुके खोबरे व खसखस भाजून गुळाबरोबर घालू शकतो. पण त्यामुळे पोळी फुटण्याची शक्यता असते.
 4. 4. कणिक चाळून कडकडीत तेल, डाळीचे पीठ व मीठ घालून घट्ट भिजवून तेलाच्या हाताने कणिक मळावी.
 5. 5.कणकेचे एकसारखे मोठ्या लिंबाच्या एवढे गोळे करावे . त्याच्या निम्मे गुळाचे गोळे करावे .दोन कणकेचे गोळे किंचित चपटे करून तेवढयाच आकाराची गुळाची गोळी करून मध्ये ठेवून मग तांदूळ पिठीवर लाटावे.
 6. 6.पातळ पोळी लाटून गरम तव्यावर खमंग भाजावी. पोळी तव्यावर फुटल्यास ओल्या फडक्याने तवा पुसून दुसरी पोळी घालावी. टीप-पोळी पातळ लाटली तरच खुसखुशीत होते जाड लाटली तर चिवट होते गूळ बाहेर येतो .
 7. टीप -गूळ पाव किलो घेतल्यास साधारण बारा ते पंधरा मध्यम आकारातील पोळ्या होतात .

My Tip:

२.गुळाची पोळी निर्लेपसारख्या नॉनस्टिक तव्यावर भाजल्यास पोळी फुटत नाही व गूळ बाहेर येत नाही.

Reviews for GULPOLI Recipe in Marathi (0)