सुक मटण | Sukka Mutton Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  4th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sukka Mutton by samina shaikh at BetterButter
सुक मटणby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

0

0

सुक मटण recipe

सुक मटण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sukka Mutton Recipe in Marathi )

 • दीड वाटी सुके खोबरे(थोडे गँस वर भाजून)
 • 1 किलो मटण
 • 2 टोम्याटो
 • 3 कांदे (1चमचा तेलात थोडे लाल करून)
 • मीठ(चवीनुसार)
 • 1चमचा गरम मसाला
 • 1चमचा लाल तिखट मसाला (घरात बनवलेला)
 • 1 चमचा लाल मिर्च पावडर
 • दीड चमचा आले लसुण पेस्ट
 • तेज पान 2
 • तेल
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धी वाटी कोथम्बीर
 • पाव वाटी पुदिना
 • 1 लिंबू

सुक मटण | How to make Sukka Mutton Recipe in Marathi

 1. खोबरे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्या
 2. आता त्यात टोम्याटो कोथम्बीर कांदा घालून छान बारीक वाटून मसाला तयार करून घ्या
 3. कूकर मधे 4चमचे तेल व त्यात तमालपत्र घाला
 4. आता लाल तिखट (पावडर व मसाला दोन्ही) आले लसुण पेस्ट हळद व वाटलेला मसाला घाला
 5. छान तेल सुटेल तो पर्यंत परता
 6. आता मटण घालून परतून घ्या
 7. मीठ व गरम मसाला घाला
 8. मटण शिजेल इतके पाणी घालून कूकर ला 3 शिट्ट्या घ्या(पाणी जास्त घालू नका )
 9. मटण शिजले की पुदिना लिंबूने गार्णीश करून सर्व करा

My Tip:

तिखटा चे प्रमाण कमी जास्त करू शकता.जास्त तिखट झाले की थोडी साय वापरू शकतो

Reviews for Sukka Mutton Recipe in Marathi (0)