मुख्यपृष्ठ / पाककृती / गुट्टी वांकाया कुरा (आंध्र शैलीतील भरलेले वांगे करी)

Photo of Gutti Vankaya Kura (Andhra Style Stuffed Eggplant Curry) by Pavani Nandula at BetterButter
11085
98
4.8(0)
0

गुट्टी वांकाया कुरा (आंध्र शैलीतील भरलेले वांगे करी)

Aug-24-2015
Pavani Nandula
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • आंध्र
  • सिमरिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. लहान वांगे - 12 धुऊन कोरडे केलेले
  2. चिंचेचा गर - 1 मोठा चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. मसाल्याचे साहित्य:
  5. भाजलेले शेंगदाणे - अर्धी वाटी
  6. तीळ - अर्धी वाटी भाजलेले
  7. जिरे - अर्धा लहान चमचा
  8. धणे - 1 मोठा चमचा
  9. लवंगा - 4
  10. दालचिनी - 1 इंच तुकडा
  11. सुकलेल्या लाल मिरच्या - 6

सूचना

  1. वांग्याला खालून 3/4 अंतरावर x आकाराचा काप द्या, परंतु त्या वांग्याचे तुकडे होणार नाही आणि ते सुस्थितीत राहील याची काळजी घ्या. बाजूला ठेवा.
  2. मसाल्याचे साहित्य कोरडे भाजा आणि त्यात चिंचेचा गर, मीठ आणि थोडे पाणी घालून वाटा. मऊ आणि घट्ट पेस्ट करा.
  3. वांग्याच्या चिरलेल्या भागाला उघडा आणि त्यात मसाला भरा. ही प्रक्रिया सर्व वांग्यांवर करा.
  4. उरलेल्या मसाल्याला बाजूला ठेवा. हा मसाला या मेनुसाठी रस्सा करताना वापरता येईल.
  5. एका परतण्याच्या पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा आणि त्यात भरलेले वांगे रचून ठेवा.
  6. झाकण लावून मध्यम आचेवर वांगे 3/4 शिजेपर्यंत शिजवा.
  7. आता उरलेल्या मसाल्यात अर्धा कप पाणी घाला आणि तो पॅनमध्ये घाला. झाका आणि रश्याला उकळी येईपर्यंत आणि वांगे पूर्ण शिजेपर्यंत शिजवा.
  8. चव तपासा आणि भाताबरोबर गरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर