मुख्यपृष्ठ / पाककृती / नागपुरी वडा भात

Photo of nagpuri vada bhat by Seema jambhule at BetterButter
1528
0
0.0(0)
0

नागपुरी वडा भात

Sep-10-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नागपुरी वडा भात कृती बद्दल

नागपुरी वडा भात ही खास विदर्भाची खासियत आहे.. वडा भात आणि त्यावर चर्रर्र करणारी अशी वरून खमंग फोडणी आणि सोबत कढी... खूप छान अशी चव असते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. 3 वाटी तांदूळ
  2. 1 वाटी मटकीची डाळ
  3. 2 वाटी चाना डाळ
  4. 1 वाटी तुरीची डाळ
  5. पाव वाटी उडीद डाळ
  6. लसूण अद्र्क पेस्ट 1 चमचा
  7. हिरवी मिर्ची 3-4
  8. कोथींबीर
  9. ओवा पाव चमचा
  10. तिखट 1 चमचा
  11. हळद पाव चमचा
  12. कडिपत्ता पाने 5-6
  13. धने जिरे पावडर 1 चमचा
  14. हिंग
  15. मोहरी 1 चमचा
  16. जिरे 1/2 चमचा
  17. लाल मिर्ची 2-3
  18. मीठ चवीनुसार
  19. तेल

सूचना

  1. सर्वात प्रथम सर्व डाळी 5-6 तास भिजत ठेवा
  2. नंतर जाडसर वाटून घ्या
  3. नंतर वाटलेला डाळीचा मिश्रणात तिखट मीठ हळद हिरवी मिरचीची पेस्ट लसूण पेस्ट कोथिंबीर कडिपत्ता ओवा धने जिरे पावडर टाकून एकजीव करून घ्या
  4. तेल गरम करायला ठेवा
  5. नंतर त्या मिश्रणाचे वडे बनवा
  6. व गरम तेलात टाका
  7. सर्व वडे कुरकुरीत तळून घ्या
  8. आता मोकळा दाणेचा असा भात शिजवून घ्या
  9. नंतर फोडणी साठी तेल गरम करा त्यात हिंग मोहरी जिरे कडिपत्ता ठच्लेला लसूणा व लाल मिर्ची टाका व खमंग फोडणी तयार करून घ्या
  10. आता एका ताटा मध्ये भात घ्या त्यावर कुस्करुन वडे टाका व त्याचा वर फोडणी टाका
  11. तयार नागपुरी वडा भात गरम गरम कढी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर