मुख्यपृष्ठ / पाककृती / साट्याच्या रंगीत करंज्या

Photo of Satyachya Rangit Karanjya by Suraksha Pargaonkar at BetterButter
1850
5
0.0(0)
0

साट्याच्या रंगीत करंज्या

Sep-11-2018
Suraksha Pargaonkar
1800 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साट्याच्या रंगीत करंज्या कृती बद्दल

दिवाळीत /सणासुदीला केला जाणारा पारंपारीक मराठी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. लाटीसाठी कणिक तयार करण्यासाठी
  2. १बाउल मैदा
  3. १छोटी वाटी तूप
  4. चवीसाठी चिमूटभर मीठ
  5. आवडीचे रंग
  6. सारण बनवण्यासाठी,
  7. एक बाउल भाजलेले सुके खोबरे
  8. १चमचा भाजलेली खसखस
  9. १छोटी वाटी पिठीसाखर
  10. चारोली,बेदाणे नि आवडत असल्यास इतर ड्रायफ्रुटचे काप
  11. साटा बनवण्यासाठी
  12. एक बाउल तूप
  13. २चमचे कोर्न फ्लोर
  14. तलण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम मैदा ,तूप आणि मीठ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्या.
  2. अशाच प्रकारे रंग मिसलून कणिक मळून घ्या.
  3. कणिक१तासभर झाकून ठेऊन द्या.
  4. बाउलमध्ये तूप घेउन त्यात कोर्न फ्लोर मिसळून फेटून घ्या..हा साटा आहे.
  5. आता प्रत्येक कणकेचा गोळा करून पोळीप्रमाणे लाटून घ्या.
  6. आता एका पोळी वर साटा पसरून त्यावर दुसरी पोळी ठेवा.पुन्हा त्या नवीन.पोळी वर साटा पसरून तिसरी पोळी ठेवा.
  7. सर्व पोळ्या अशाप्रकारे रचून झाल्या की रोल करून घ्या. त्या रोलचे छोटे काप केले की आपल्या लाट्या तयार...
  8. लाट्या तेलावर लाटून आत चमचाभर सारण(लाटीत बसेल एवढे) भरा.व कडा दाबून बंद करून घ्या.नंतर हवे असल्यास तुम्ही चेरण्याने काठ कापून घेऊ शकता.
  9. तेल गरम झाले की मंद आचेवर करंज्या तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर