मुख्यपृष्ठ / पाककृती / आंब्याचा शिरा

Photo of Mango Flavoured Semolina Halwa / Sheera by Sanika SN at BetterButter
0
8
0(0)
0

आंब्याचा शिरा

Sep-17-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंब्याचा शिरा कृती बद्दल

आमरसात बनवलेला स्वादिष्ट शिरा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • रोस्टिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

 1. १ वाटी हापूस आंब्याचा रस
 2. १ वाटी रवा
 3. १ वाटी दूध 
 4. १ वाटी पाणी
 5. ३/४ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) 
 6. २-३ टेस्पून साजूक तूप
 7. १ टीस्पून वेलचीपूड 
 8. १/२ टीस्पून जायफळपूड
 9. केशर
 10. बदाम व बेदाणे सजावटसाठी

सूचना

 1. साहित्य
 2. एका भांड्यात तूप गरम करून मध्यम आचेवर रवा चांगला भाजून घ्यावा. 
 3. रवा हलक्या सोनेरी रंगावर भाजायचा.
 4. एकीकडे दूध व पाणी एकत्र करून उकळी काढावी. 
 5. भाजलेल्या रव्यात  आता त्यात उकळलेले दूध पाणी  घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे. 
 6. रवा चांगला फुलला पाहिजे.
 7. आता त्यात साखर घालून एकत्र करावे व पुन्हा झाकून ३-४ मिनिटे शिजवावे. 
 8. त्यात बदाम, बेदाणे व केशर घालावे. आंब्याचा रस घालून चांगले एकत्र करा व झाकून २-३ मिनिटे शिजवणे.
 9. शेवटी वेलचीपूड,  जायफळपूड घालून चांगले मिक्स करावे. 
 10. कोलाज फोटोचा दुसरा भाग
 11. गरमा-गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर