मुख्यपृष्ठ / पाककृती / चूरमा लाडू

Photo of Churma Ladoo by Sanika SN at BetterButter
917
6
0.0(0)
0

चूरमा लाडू

Sep-19-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चूरमा लाडू कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी कणिक
  2. १/४ वाटी रवा
  3. १/२ वाटी वितळलेले तूप +२ टेस्पून तूप
  4. ३/४ वाटी पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
  5. १/२ वाटी भाजलेली खसखस
  6. दूध कणिक भिजवण्याकरिता
  7. काजू-पिस्ता तुकडे
  8. १/२ टीस्पून वेलचीपूड
  9. १/४ टीस्पून मीठ
  10. तळायला तूप / तेल

सूचना

  1. साहित्य
  2. एका भांड्यात कणिक, रवा व मीठ एकत्र करावे.
  3. त्यात २ टेस्पून तूप घालून चांगले मिक्स करुन घ्यावे.
  4. लागेल तसे दूध घालून घट्ट कणिक भिजवून घ्यावी.
  5. झाकून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
  6. १०-१५ मिनिटांनी कणिक चांगली मळून घ्यावी.
  7. कणकेच्या छोट्या पुर्‍या/ मुटके/ गोळे करुन घ्यावे.
  8. तुम्ही ह्या पुर्‍या तुपात मंद आचेवर डिप फ्राय करु शकता.
  9. मी आप्पेपात्रात चमचाभर तूप घालून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घेतल्या आहेत.
  10. तळून किचन टिश्युवर काढून ठेवाव्यात.
  11. पूर्ण गार झाल्यावर खल-बत्त्यात थोडे कुटून घ्यावे व मग मिक्सरला बारीक फिरवून घ्यावे.
  12. कोलाज फोटोचा दुसरा भाग
  13. चुरम्याला एका ताटात काढून घ्यावे.
  14. त्यात काजू-पिस्ता तुकडे, वेलचीपूड घालून मिक्स करावे.
  15. पिठीसाखर घालून छान एकत्र करावे.
  16. त्यात थोडे पातळ केलेले तूप घालून मध्यम आकाराचे लाडू बांधावेत.
  17. तयार लाडू खसखशीत घोळवून घ्यावे.
  18. चुरम्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर