मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी-मोतिया खीर

Photo of Bottlegourd-Sago Pudding by Sanika SN at BetterButter
603
2
0.0(0)
0

दुधी-मोतिया खीर

Sep-30-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी-मोतिया खीर कृती बद्दल

दुधी व साबुदाण्याची स्वादिष्ट खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी साल व बीया काढून किसलेला दुधी
  2. १ लिटर दुध
  3. २-३ टेस्पून भिजवलेला साबुदाणा
  4. ३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
  5. १ टीस्पून बदामाचे काप
  6. १ टीस्पून पिस्त्याचे काप
  7. १/४ टीस्पून केशर
  8. १/२ टीस्पून वेलचीपूड
  9. १ टेस्पून साजुक तूप

सूचना

  1. साहित्य
  2. एका पॅनमध्ये साजुक तूप घालून दुधीचा कीस १-२ मिनिटे परतून घ्या.
  3. त्यात दुध घालून उकळी आणा, आच मध्यम असावी.
  4. दुधीचा कीस दुधात शिजला की त्यात भिजवलेला साबुदाणा घाला व तो पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या.
  5. आता केशर,साखर व वेलचीपूड घाला.
  6. साखर विरघळली की गॅस बंद करून, वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला व खीर थंड होऊ द्या.
  7. ही खीर गार जास्तं छान लागते.
  8. दुध खूप आटवायचे नाही, साबुदाण्यामुळे दाटपणा येतो खीरीला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर