मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापुरी भडंग

Photo of Kolhapur's Bhadang by Sanjay Patil at BetterButter
917
5
0.0(0)
0

कोल्हापुरी भडंग

Oct-03-2018
Sanjay Patil
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापुरी भडंग कृती बद्दल

हेल्दी आणि टेस्टी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. कोल्हापूरी चिरमुरे २५० ग्रॅम ( इतर सुद्धा वापरु शकता)
  2. शेंगदाणे १०० ग्रॅम
  3. तेल १ मध्यम वाटी
  4. पिठ्ठी साखर १/२ वाटी
  5. आल्ले लसुन पेस्ट २ चमचे
  6. कडूपत्ता १० ते १५ पाने
  7. लाल तिखट पुड ५ चमचे
  8. धनेपुड,जीरेपुड,हिंग,हळदपुड,गरम मसाला, प्रत्येकी १ चमचा
  9. मीठ चवीनुसार....

सूचना

  1. प्रथम एका मोठ्या भांड्यात चिरमुरे घ्या
  2. गॅसवर कढई ठेवुन त्यात तेल घाला व त्यामध्ये मंदआचेवर शेंगदाणे तळुन घ्या व तळुन झालेवर ते चिरमुऱ्यावर टाका
  3. त्यानंतर त्याच तेलामध्ये आल्ले लसुन पेस्ट व कडीपत्ता घाला व थोडे परतुन घ्या
  4. त्यानंतर त्यामधे धनेपुड जीरेपुड हळद हिंग गरम मसाला मिठ घाला व परतुन घेवुन गॅस बंद करा
  5. तेल थोडे गार झालेवर मग लाल तिखट घाला व हे सर्व मिश्रण पातेल्यातील चिरमुऱ्यावर ओता व एकसारखे मिक्स करुन घ्या
  6. त्यात आता पिठीसाखर घालुन परत एकदा सर्व चांगले मिक्स करा व चिरलेला कांदा कोथिंबीर घालुन वरुन लिंबु पिळुन खायला घ्या.. मस्त लागतो
  7. चिरमुरे तांदूळापासून फुलवुन बनवत असलेमुळे पित्तशामक आहेत व यापासून बनविलेला हा भडंग एखाद्या व्यक्तींची तोंडातील तव गेली असल्यास खावयास द्यावा.. लाळेच उत्पन्न होण्याचे प्रमाण वाढते न भुक वाढावयास चांगली मदत होते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर