Home / Recipes / kolhapuri misalpav

Photo of kolhapuri misalpav by Geeta Koshti at BetterButter
948
6
0.0(0)
0

kolhapuri misalpav

Feb-16-2018
Geeta Koshti
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. २ - ३ वाटी मिळुन ( मोड आलेली मटकी , मुग )
  2. १ कांदा १ टोमॅटो
  3. गरम मसाला
  4. फरसाण चिवडा
  5. कोथिंबीर , लिंबू
  6. पाव लादी
  7. कट बनवण्यासाठी साहित्य -
  8. ३-४ लसूण पाकळ्या १ इंच आले
  9. कांद्याची पेस्ट १ वाटी
  10. १ उकडलेला बटाटा कुस्करून
  11. टोमॅटो पेस्ट १ / २ वाटी
  12. १ चमचा जिरेपूड १ चमचा धनेपूड
  13. ४-५ लहान चमचे लाल तिखट फोडणीसाठी तेल
  14. घरचा गरम मसाला ( तिखट ) गरजेपुरता

Instructions

  1. मटकी, मुग १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे
  2. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत
  3. कांदा , बटाटा बारीक कापून घ्या
  4. कुकर मध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून
  5. कांदा घालून गुलाबी करुन घ्या तोपर्यंत मटकी धुवून घ्या
  6. १-२ चमचा गरम मसाला घालावा. मटकी , मुग , बटाटा , मिठ घालून परतून पाणी घालावे, बारीक गॅसवर उकळावे
  7. कुकरचे झाकण लाऊन 2 शिट्टी करुन घ्या ऊसळ तयार
  8. लहान कढईत उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार मसाला घालावा मीठ घालावे तररी साठी .
  9. कट कृती -
  10. कढईत तेल टाकून कांदा , टोमॅटो पेस्ट लसूण घालून परतून घ्या घरचा मसाला टाका
  11. १ चमचा जिरेपूड १ चमचा धनेपूड घाला
  12. १ उकडलेला बटाटा कुस्करून घालावे
  13. पाणी घालून चागंले ऊकळू द्या कट तयार
  14. नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. तररी घाला सोबत पापड त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, कोथिंबीर घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ पाव सोबत खावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE