मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रोटिन रोल्स

Photo of Protein rolls by Susmita Tadwalkar at BetterButter
373
3
0.0(0)
0

प्रोटिन रोल्स

Oct-11-2018
Susmita Tadwalkar
4 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रोटिन रोल्स कृती बद्दल

प्रोटीनयुक्त पदार्थ वापरून बनवलेली ही कृती सर्वांना नक्कीच आवडणार!

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप काबुली चणे
  2. १ कप सोया चंक्स
  3. ३-४ चमचे प्रोसेस्ड चीज
  4. आलं, लसूण व हिरवी मिरची ह्याची पेस्ट
  5. १/२ चमचा गरम मसाला
  6. मिठ चवीप्रमाणे
  7. बारिक चिरलेली कोथिम्बीर
  8. २ चमचे तिळ
  9. २-३ चमचे तेल

सूचना

  1. काबुली चणे ४-५ तास भिजत घाला
  2. धुऊन कुकर मध्ये घालून ४-५ शिट्या करून घ्या
  3. पाणी गरम करून घ्या व त्यात सोया चंक्स उकळून घ्या
  4. चणे आणि सोया चंक्स ह्यातील पाणि काढून घ्या
  5. आता काबुली चणे मिक्सर मध्ये घालून वाटून घ्या
  6. सोया चंक्स मधील पाणी हलक्या हातानी दाबून घ्या व मिक्सर मध्ये घालून वाटून घ्या
  7. चणे आणि सोया चंक्स ह्याची पेस्ट एकत्र करा
  8. त्यात आलं, लसूण, मिरची ची पेस्ट, मिठ, गरम मसाला पाउडर व बारिक चिरलेली कोथिम्बीर घालून मिसळून घ्या
  9. आता ह्या मिश्रणाचे छोटे गोळे करून थापून त्यामध्ये चीज भरा
  10. सर्व बाजूंनी निट बंद करा व रोलचा आकार द्या
  11. हे रोल्स‌ तिळामध्ये घोळवून घ्या व थोडं थोडं तेल सोडून तव्यावर शॅलो फ्राय करा
  12. साॅस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर