BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ढाबा स्टाईल अंडा मसाला

Photo of Dhaba Style Anda Masala by Manisha Lande at BetterButter
0
1
0(0)
0

ढाबा स्टाईल अंडा मसाला

Oct-13-2018
Manisha Lande
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढाबा स्टाईल अंडा मसाला कृती बद्दल

खुप टेस्टी पदार्थ आणिक त्यात अंडी असल्यामुळे खुप पौष्टिक देखील आहे.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. ६ अंडी
 2. १ मोठा चमचा बेसन
 3. २ मध्यम कांद्याची पेस्ट
 4. १ मोठ्या टोमॅटोची पेस्ट
 5. २ तमालपत्र
 6. १/२ छोटा चमचा गरम मसाला
 7. १/४ छोटा चमचा जिरं
 8. १ मोठा चमचा लाल तिखट
 9. १ छोटा चमचा धने-जीरे पुड
 10. १/२ छोटा चमचा हळद
 11. चवीनुसार मीठ
 12. तेल

सूचना

 1. प्रथम अंडी उकडून त्याची सालं काढून घेतली.
 2. नंतर त्याला १ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा गरम मसाला छान सर्व बाजूंनी चोळून लावुन घेतले व थोडा वेळ मॅरिनेट करुन ठेवले.
 3. कढईत २ मोठे चमचे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात मॅरिनेट केलेली अंडी घालून छान फ्राय करुन घेतली.
 4. नंतर त्याच कढईतील तेलामध्ये जिरं, तमालपत्र, कांद्याची पेस्ट घालून छान सोनेरी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं.
 5. नंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून टोमॅटोचा कच्चट वास जाईपर्यंत परतून घेतले.
 6. पॅनमध्ये बेसन खमंग भाजून घेतले.
 7. नंतर कांदा-टोमॅटोच्या मिश्रणात भाजलेले बेसन घालून थोडावेळ परतून त्यात लाल तिखट, धने-जीरे पुड घालून त्यात ग्रेव्ही जितकी पातळ हवी तितकं गरम पाणी घालुन चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घेतले.
 8. नंतर त्यात फ्राय केलेली अंडी घालून १ ऊकळी येईपर्यंत शिजवून घेतलं.
 9. नंतर अंडा मसाला सर्व्हींग बावुल मध्ये काढुन त्यावर कांद्याच्या चकत्या व कोथिंबिरीचे पान लावून गरमागरम सर्व्ह केले.
 10. ढाबा स्टाईल अंडा मसाला खायला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर