मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी रेड बीन्स बर्गर

Photo of Healthy Red Beans Burger by Shraddha Juwatkar at BetterButter
1166
2
0.0(0)
0

हेल्दी रेड बीन्स बर्गर

Oct-14-2018
Shraddha Juwatkar
7 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी रेड बीन्स बर्गर कृती बद्दल

राजमा हे प्रोटीनचे पाॅवरहाऊस आहे.100 ग्राम राजमा मध्ये 21 ग्राम भरपूर प्रमाणात प्रोटीन भेटते ,बुद्धी ची चालना वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाड मजबूत करते,ह्या मध्ये कॅल्शियमचे प्रमाणही जास्त आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी राजमा
  2. 1 उकडलेला बटाटा
  3. 2 टेबलस्पून हिरवे मटार
  4. 1 टेबलस्पून किसलेले गाजर
  5. 1 टेबलस्पून उकडलेले मक्याचे दाणे
  6. 2 टेबलस्पून किसलेले पनीर
  7. 1 टेबलस्पून प्लेन ओट्स
  8. 1 टेबलस्पून आले लसूण हिरवी मिरची पेस्ट
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडा टोमॅटो सॉस
  10. लाल तिखट, गरम मसाला व चाट मसाला पाव चमचा
  11. तिळ लावलेले बर्गर बन आवश्यकतेनुसार
  12. कांदा टोमॅटोचे गोल काप
  13. बटर आवडीनुसार
  14. चीज स्लाइस  आवश्यकतेनुसार
  15. टोमँटो साँस
  16. तेल

सूचना

  1. राजमा रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवून सकाळी कुकर मध्ये थोडे मीठ व हळद घालून 5/6 शिट्या करून घ्याव्या.राजमा व्यवस्थित शिजायला हवा.
  2. राजमाचे पाणी सर्व गाळून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. एका बाऊल मध्ये काढून त्यात किसलेले बटाटे,गाजर, हळद,मीठ, लाल तिखट, चाट मसाला, हिरवे मटार, उकडलेले मक्याचे दाणे, टोमॅटो सॉस घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  3. आता हया मिश्रणात किसलेले पनीर व कोथिंबीर घालून ओट्स घालावे. ओट्समुळे पौष्टीक तसेच चिकटपणा येतो व सर्व भाज्या नीट एकत्र गोळा होण्यासपण मदत होते. 
  4. आता वरील मिश्रणाचे गोळे करून कटलेट सारखा गोल आकार देऊन नंतर पॅनमधे थोडे-थोडे तेल सोडून उलटे-पालटे तांबूस रंगावर शॅलोफ्राय करा.
  5. आता बर्गर बन घ्या. उघडा व त्याच्या एका भागावर बटर लावा. व दुसर्या भागावर मेयोनिझ व टोमँटो साँस लावा. नंतर बटर लावलेल्या भागावर तयार कटलेट ठेवा. नंतर त्यावर कांदा, टोमँटोचे काप ठेवा. चाट मसाला भुरभूरा. शेवटी वरून चीजचे स्लाईस ठेवून व मेयो साँस लावून ठेवलेला दुसरा बनचा भाग वर ठेवा.
  6. यम्मी यम्मी बर्गर मुलांना खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर