मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याचा तिखट सांजा

Photo of Ravyacha Tikhat Sanja by Manisha Lande at BetterButter
1132
2
0.0(0)
0

रव्याचा तिखट सांजा

Oct-16-2018
Manisha Lande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याचा तिखट सांजा कृती बद्दल

हा सांजा जनरली आपण तिखटाचा शिरा बोलतो. खुप टेस्टी आणि चविष्ट आणि पटकन होणारा पदार्थ आहे अॅज स्नॅक म्हणुन खुप फेमस आहे, आपल्याकडे लग्न, मुंजी, बारसे अशा ठिकाणी आजही हा तिखट सांजा अॅज अ स्नॅक म्हणुन चवीने खाल्ला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी रवा ( शिरयाचा )
  2. १/४ वाटी साजुक तुप
  3. १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
  4. १ मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो
  5. ३ ते ४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन
  6. ५ ते ६ कढीपत्याची पानं
  7. १/४ छोटा चमचा मोहरी / राई
  8. चवीनुसार मीठ
  9. १/४ छोटा चमचा साखर
  10. गरम पाणी

सूचना

  1. प्रथम कढईत साजुक तुप घालून ते गरम झाल्यावर त्यात रवा घालून छान सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतला व बाजूला ठेवला.
  2. नंतर कढईत थोडं तेल गरम करून त्यात कढीपत्याची पानं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, व मोहोरी घालून ती तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला.
  3. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून त्यात भाजलेला रवा घालून थोडं परतून त्यात चवीनुसार मीठ व थोडी साखर घालुन सर्व एकजीव करून घेतले.
  4. नंतर त्यात गरम पाणी घालुन मिश्रण ढवळुन रवा छान फुलेपर्यत परतून घेतला.
  5. त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर एक वाफ काढून सांजा शिजवून घेतला.
  6. तयार सांजा सर्व्हींग प्लेटमध्ये काढून कोथिंबिरीचे पान लावून गरमागरम सर्व्ह केला.
  7. "रव्याचा तिखट सांजा" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर