मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाना ग्रिन चटणी चिझ बाँम्बस .

Photo of Sago Green Chutney Chesse Bombs by Triveni Patil at BetterButter
399
5
0.0(0)
0

साबुदाना ग्रिन चटणी चिझ बाँम्बस .

Oct-27-2018
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाना ग्रिन चटणी चिझ बाँम्बस . कृती बद्दल

स्नँक्स, ब्रेकफास्ट,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी भिजवलेला साबुदाना.
  2. २. ३ उकडून स्मँश केलेला बटाटे.
  3. ३. अर्धी वाटी शेंगदाना जाड भरड कुट
  4. ४. १ टिस्पुन जिरे.
  5. ५. १ हिरवी मिरची.
  6. ६. अर्धा इंच आद्रक.
  7. ७. चवी पुरते मीठ.
  8. ८. तळण्या साठी तेल.
  9. स्टफिंग :-
  10. १. अर्धा चमचा खवलेले खोबरे.
  11. २. २ हि. मिरची.
  12. ३. अर्धा इंच अद्रक.
  13. ४. अर्धी वाटी किसलेले चिझ.
  14. ५. बारिक चिरलेली कोथिंबीर.
  15. ६. चवी पुरते मीठ.

सूचना

  1. १. आदल्या रात्री साबुदाना स्वच्छ धुवुन अर्धा इंच वर पाणी घालून भिजवा. अर्ध्या तासानंतर पाणी नितरवून झाकुन ठेवा.
  2. २.सकाळी भिजलेले साबुदाने एका बाऊल मध्ये घेवुन त्यात किसलेला बटाटा, शेंगदाना कुट, एक बारिक चिरलेली हि. मिरची टाका, व आद्रक किसुन टाका, मग यात जिरे आणी चवी पुरते मीठ घेवुन छान मिक्स करून घ्या जसे साबुदाना वडा बनविन्या साठी करतो अगदी तसेच.
  3. ३.किसलेले खोबरा किस, हि. मिरची, अद्रक, व चवी पुरते मीठ घालून मिक्सर च्या भांड्यात चटणी फिरवून घ्या. एका वाटित चटणी काढुन त्यात अगदी थोडी चिली फ्लेक्स, व बारिक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून स्टफिंग तयार करून घ्या.
  4. ४.आता भिजवलेल्या गोळ्या मधुन लिंबा एव्हढा गोळा घेवून हातावर पारी बनवून घ्या त्या पारी मध्ये तयार केलीली चटणी व किसलेले चिझ भरून पारी नीट बंद करून बाँल तयार करून घ्या. दुसरी कडे गँसवर कढईत तेल तापवायला ठेवा.
  5. ५. गरम तेलात मिडीयम गँस वर डिप फ्राय करून घ्या. बाकी सर्व उरलेले बाँल्स पण अशेच तयार करून फ्राय करून घ्या. गरम गरम चटणी बाँल्स तळलेल्या हिरवी मिरची बरोबर सर्व्ह करा.
  6. ६. मी स्टफिंग मध्ये थोडे ईटालीयन सिझनींग, व आँरिगँनो पण मिक्स केले आहेत.
  7. ७. स्टफिंग मध्ये मीठ घालताना जरा कमीच घाला, कारण चिझ मध्ये आँलरेडी मीठ असते.
  8. ८. बाँल्स मिडीयम गँस वरच फ्राय करायचे आहेत तेव्हाच ते बाहेरून क्रिस्पी व आतून चिझ मेल्ट झालेले असेल.
  9. ९. चटणी बारिक करतांना पाणी अजीबात नाही वापरायचे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर