मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज लाॅलीपाॅप

Photo of Veg lollipops by Manasvi Pawar at BetterButter
749
1
0.0(0)
0

वेज लाॅलीपाॅप

Oct-28-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज लाॅलीपाॅप कृती बद्दल

चटपटीत वेज लाॅलीपाॅप हे एक हेल्दी स्टाटऺर आहे बघू झटपट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन बटाटे उकडून
  2. १/२ वाटी कोबी बारीक चिरुन
  3. एक सिमला मिरची
  4. ५/६ फरसबी
  5. एक लहान गाजर
  6. चार कांद्याची पात ओली
  7. चार ब्रेड स्लाइस
  8. दोन चमचे मैदा
  9. तेल तळण्यासाठी
  10. मीठ चवीनुसार
  11. पाव चमचा हळद
  12. एक चमचा धणे पावडर
  13. एक चमचा चाट मसाला
  14. एक चमचा लाल तिखट
  15. दोन चमचे किसलेले आले

सूचना

  1. बटाटे उकडून कुस्करून घ्यावे
  2. सगळ्या भाज्या बारीक चिरून धुऊन घ्या
  3. एका पातेल्यात बटाटे घेऊन
  4. नंतर सगळ्या भाज्या एकत्र कराव्यात कोबी गाजर फरसबी सिमला मिरची आणि कांद्याची पात
  5. एकत्र करून घ्या आणि त्यात आता धणे पावडर हळद मीठ लाल तिखट किसलेले आले व चाट मसाला घालून एकजीव करावे
  6. आता या मिश्रणाचे लहान गोळे करून घ्यावेत
  7. आता दोन चमचे मैदा घ्या त्यात पाणी घालून पातळ करून घ्या
  8. ब्रेड चे क्रम्स करून घ्या
  9. तेल तापले की गॅस स्लो करा
  10. आता तयार गोळे मैदा बॅटर मध्ये डीप करून ब्रेड क्रम्स मध्ये कोटेड करून तेलात सोडावे
  11. सोनेरी रंगावर तळून घ्या
  12. साॅसबरोबर गरमागरम खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर