मुख्यपृष्ठ / पाककृती / लसूण चिवडा

Photo of Garlic Chivda by Deepa Gad at BetterButter
2729
4
0.0(0)
0

लसूण चिवडा

Nov-03-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूण चिवडा कृती बद्दल

माझी आई चिवड्यात लसूण ठेचून घालते, त्या चिवड्याला मस्त लसणीचा वास लागतो मग चव तर अप्रतिम लागते, चला तर मग बघू या लसणी चिवडा ......

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. पातळ पोहे १/२ किलो
  2. शेंगदाणे ५० ग्राम
  3. लसूण पाकळ्या १/२ वाटी
  4. डाळे ५० ग्राम
  5. सुके खोबरे अर्धी वाटी
  6. हिरव्या मिरच्या १२
  7. कढीपत्ता १ वाटी
  8. धने १ च
  9. तीळ १ च
  10. मीठ चवीनुसार
  11. पिठीसाखर १ च
  12. हिंग १/२ च
  13. मोहरी १/२ च
  14. तेल १/२ वाटी

सूचना

  1. पोहे चाळून घेऊन थोडे थोडे कढईत घालून भाजून घ्या, भाजताना त्यात चिमूटभर मीठ घाला म्हणजे पोहे आक्रसत नाही
  2. हिरवी मिरची चिरुन घ्या, खोबरे पातळ काप करा, लसूण सोलून ठेचून घ्या, कढीपत्ता धुवून कोरडा करून घ्या, शेंगदाणे भाजुन सोलून घ्या,
  3. मोठया कढईत तेल घालून हिंग, मोहरी तडतडली की क्रमाक्रमाने लसूण, हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत भाजा
  4. आता त्यात खोबर्याचे काप घालून लालसर होईपर्यंत भाजल की बाकीचे साहित्य धने, तीळ, शेंगदाणे, मीठ, साखर घाला
  5. शेवटी डाळे व हळद टाकून परतून भाजलेले पोहे चाळून घाला व दोन बाजूला कढई पकडून चिवडा वरखाली करा, चमच्याने जास्त ढवळू नका पोहे कुस्करतात
  6. थोडावेळ ५ मिनिटे गॅसवर ठेवून मग गॅस बंद करा, थोडा थंड झाला की त्यावर झाकण ठेवू नका पेपर ठेवा म्हणजे पूर्णपणे थंड झाले की प्लास्टिक पिशवीत घालून मग डब्यात भरून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर