प्रथम गॅस वर एका मोठ्या कढईत बेसन भाजायला सुरवात करावी. पाच मिनिटे बेसन चांगले गरम झाले कि त्यात मोठ्या चमच्याने तुप टाकून हलवावे असे तुप थोड्या थोड्या वेळाने पळीने तुप घालून बेसन चांगले तुपात खमंग भाजणे हळूहळू बेसनाचा रंग थोडा गडद होत राहील. या कृतीला मध्यम गॅसवर साधारण 50 ते 55 मिनिटे लागतात. नंतर गॅस बंद करावा. व ते मिश्रण पुर्ण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर मिसळून हातानेच सर्व मिसळावे व एकजीव करुन घ्यावे. वेलची पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. नंतर ड्रायफ्रुटस वापरून लाडू वळावेत.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा