Photo of Sanjori by Chayya Bari at BetterButter
1019
6
0.0(0)
0

सांजोरी

Nov-09-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांजोरी कृती बद्दल

ही खानदेशातील पाककृती असून दिवाळीत केलीच जाते गव्हाचा जात्यावर रवा काढून बनवितात मी रेडीमेड रवा वापरला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 2 वाट्या
  2. गूळ किंवा पावडर 1.5 वाटी
  3. तूप 1/2 वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा
  5. मैदा 2 वाट्या
  6. मीठ चिमुटभर
  7. तळण्यासाठी वनस्पती तूप
  8. 2 चमचे गरम तेल मोहन देण्यासाठी

सूचना

  1. प्रथम मैद्यात चिमुटभर मीठ व गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करावे व मध्यम भिजवून ओल्या कापडाने झाकून ठेवा
  2. आता तूप गरम करून त्यात रवा छान भाजून घ्या
  3. गुळात 1.5 कप पाणी घालून उकळी आणा आता त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा 1वाफ घ्या व मिश्रण ताटात पसरून गार करा व त्याचे गोळे बनवा
  4. आता मैद्याची पारी लाटून त्यात सारणाचा गोळा भरून बंद करा व हलक्या हाताने लाटा
  5. सर्व संजोऱ्या भरून झाल्या की करांजिप्रमाने तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर