BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी मटण दम बिर्याणी

Photo of Keshari Mutton Dum Biryani by Anil Pharande at BetterButter
620
0
0(0)
0

केशरी मटण दम बिर्याणी

Nov-11-2018
Anil Pharande
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी मटण दम बिर्याणी कृती बद्दल

लाजवाब केशरी मटण दम बिर्याणी

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • मुघलाई
 • सिमरिंग
 • प्रेशर कूक
 • ब्लेंडींग
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. मटण 750 ग्राम
 2. बासमती तांदूळ 750 ग्राम्स
 3. कांदे 4
 4. जिरे 1 टीस्पून
 5. धने 1 टीस्पून
 6. बडीशेप 1 टीस्पून
 7. तमालपत्र 2
 8. बादयान फुल 2
 9. दालचिनी 4 तुकडे
 10. मसाला विलायची 4
 11. हिरवी विलायची 8
 12. लवंगा 12
 13. काळी मिरी 10
 14. लसूण पेस्ट दीड टीस्पून
 15. केशर इसेन्स ३ ते 4 थेंब
 16. केशर few strands
 17. दूध पाव कप
 18. दही पाव कप
 19. गरम मसाला 1 टीस्पून
 20. लिंबू अर्धा
 21. कोथिंबीर
 22. पुदिना
 23. मीठ चवीप्रमाणे
 24. हिरव्या मिरच्यांची पेस्ट 1 टेबलस्पून
 25. साजूक तूप
 26. तेल

सूचना

 1. कुकरमध्ये मटण, कांद्याची पेस्ट, जिरे, आख्खे धने व बडीशेप, तमालपत्र, बादयान फुल, दालचिनी, मसाला विलायची, हिरवी विलायची, लवंगा, काळी मिरी, लसूण पेस्ट, केशर इसेन्स २ ते ४ थेंब, व पाणी घालून झाकण लावून मटण शिजवून घेणे,
 2. व एका भांड्यावर चाळणी ठेवून भांड्यातील सूप भातासाठी बाजूला काढून ठेवणे,
 3. मटनातील खडे मसाले काढून टाकणे व फक्त पिसेस घेणे
 4. हंडीमध्ये साजूक तूप गरम करून २ कांदे उभे चिरून सोनेरी रंगावर तळून घेणे व प्लेटमध्ये काढणे,
 5. त्याच हंडीमध्ये जे राहिलेले तूप आहे त्यामध्ये थोडेसे तेल घालणे व तमालपत्र, दालचिनी, शहाजीरे, बादयान फुल, हिरवी विलायची, मोठी विलायची, चिली फ्लेक्स, आले लसूण पेस्ट घालून परतणे,
 6. त्यात शिजवलेले मटणाचे तुकडे घालून परतणे, हिरव्या मिरच्यांची वाटलेली पेस्ट घालणे, मीठ घालणे , परतणे
 7. व त्यात 750 ग्राम धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला बासमती तांदूळ घालणे व परतणे, त्यात तांदुळाच्या दुप्पट मटण शिजवलेले सूप व पाणी मोजून घालणे, किंवा भाताच्या वर बोटांची एक पेर पाणी व सुप घालणे,
 8. लिंबू पिळणे, गरम मसाला घालणे, पाव कप दही घालणे, मीठ चेक करणे व भात शिजवून घेणे,
 9. भाताचे पाणी आटल्यानंतर भात वर खाली अलगद मिक्स करणे त्यावर पाव कप कोमट दुधामध्ये भिजत ठेवलेले केशर शिंपडणे, तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना याचा भातावर थर देणे,
 10. झाकणाला कापड लावून हंडीवर झाकण ठेवून तव्यावर हंडी ठेवणे व १५ ते २० मिनिटे दम देणे ,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर