मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या तुरीची आमटी

Photo of Olya Turichi Aamti by Sanjay Patil at BetterButter
1787
3
0.0(0)
0

ओल्या तुरीची आमटी

Nov-14-2018
Sanjay Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या तुरीची आमटी कृती बद्दल

आजकाल देशी तुर मिळतं नाही पण ग्रामिण भागांत किंवा शहरातही तुरीच्या शेंगा विकावयास येतात. आम्ही लहान असताना आमची आजी सकाळी चुलींवर ही भाजी करायची व न्याहरी म्हणुन भाकरी व दह्या बरोबर खायला द्यायची , ती चव अजुनही जीभेवर कायम रेंगाळते म्हणुनच त्या चवीची आठवण म्हणुन हा एक प्रयत्न...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. ओल्या तुरीचे दाणे १ वाटी
  2. २ चिरलेले कांदे
  3. ५ ते ७ लसुन पाकळ्या चेचुन
  4. प्रत्येकी २ चमचे जीरे व मोहरी
  5. १ चमचा हळद
  6. २ ते ३ चमचे कांदा लसुन चटणी
  7. ५ चमचे तेल
  8. कोथिंबीर चवीनुसार
  9. मिठ चवीनुसार

सूचना

  1. (प्रथम तुरीच्या २५० ग्रॅम शेंगा सोलुन घ्या, त्यापासुन १ वाटी दाणे निघतात)
  2. गॅसवर एका लोखंडी तव्यात किंवा कढईत २ चमचे तेल घालुन त्यात तुरीचे दाणे भाजून घ्या व भाजल्यानंतर खलबत्यात थोडे चेचुन घ्या व बाजुला काढुन ठेवा
  3. आता त्याच कढईत ३ चमचे तेल घेवुन त्यात जीरे, मोहरी घाला व तडतडु द्या, त्यात मग कांदा, लसुन घालुन चांगला परतुन घ्या, मग त्या हळद व चटणी घाला व जरासे परतुन भाजलेले तुरीचे दाणे घाला व चांगले परता
  4. आपल्याला हवे तेवढे पाणी घाला, त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घाला व चांगली ८ ते १० मिनिटे उकळल्यानंतर भाकरी व दह्याबरोबर सर्व्ह करा. फार चांगली लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर