Photo of DADPE POHE by Aditi Bhave at BetterButter
1067
1
0.0(0)
0

दडपे पोहे

Nov-17-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दडपे पोहे कृती बद्दल

माझी आजी बेळगाव ची. त्यामुळे पोहे बरेच वेळा व्हायचे.पटकन होणारे दडपे पोहे म्हणजे एक सगळ्यांचा विकपॉइंट च.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. पातळ पोहे - 4 वाटी
  2. साखर - 2 चमचे
  3. लिंबू - अर्धे
  4. मीठ - चवी नुसार
  5. तेल - 2 मोठे चमचे
  6. हळद- 1 चमचा
  7. हिंग - 1 चमचा
  8. मोहरी - अर्धा चमचा
  9. शेंगदाणा - अर्धी वाटी
  10. ओलेखोबरे - 1 वाटी
  11. कोथिंबीर - अर्धी वाटी
  12. सांडगी मिरची - 2

सूचना

  1. सांडगी मिरच्या तळून घ्याव्यात.
  2. त्याच तेलात शेंगदाणे घालून तळावे.
  3. त्यात हिंग , मोहरी, हळद घालून छान फोडणी करावी
  4. पोहे चाळून घ्यावेत.
  5. तयार फोडणी पोह्यांवर घालावी .
  6. मीठ , साखर, लिंबू पिळून घालावे.
  7. खोबरं, कोथींबीर घालावी.
  8. एखादी सांडगी मिरची चुरून घालावी.
  9. मस्त कालवून घ्यावे.
  10. दडपेपोहे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर