मुख्यपृष्ठ / पाककृती / चिंच-गुळाच्या चिकोल्या

Photo of Tamarind-Jagery Chikolya by Tejashree Ganesh at BetterButter
707
3
0.0(0)
0

चिंच-गुळाच्या चिकोल्या

Nov-17-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिंच-गुळाच्या चिकोल्या कृती बद्दल

खेड्यामधे बरेचवेळा भाजीचा तसा तुटवडा असेच, अशावेळी पोळी-भाजी व डाळ ह्यांचा मिलाप घालणारी ही माझ्या आजीची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप तुरीची डाळ
  2. २ टोमॅटो बारिक चिरून
  3. २-३ लसून पाकळ्या
  4. १/२ लहान चमचा मोहरी
  5. १/२ लहान चमचा जिरं
  6. हळद
  7. मिठ
  8. मिरची पावडर चविप्रमाणे
  9. घरचा वापरायचा कुठलाही मसाला चविप्रमाणे
  10. फोडणी करिता तेल
  11. २ चमचे चिंचगुळाचा कोळ
  12. कढिपत्ता (अनिवार्य)
  13. कोखिंबीर
  14. २ वाट्या गव्हाचे पिठ
  15. कणकेकरिता मिठ
  16. पाणी

सूचना

  1. प्रथम दाळ स्वच्छ धुवून एका जाड बुडाच्या भांड्यात शिजवून घेतले. (मी कुकरचा वापर केला आहे)
  2. दाळ शिजेपर्यंत कणीक मळून झाकून ठेवली.
  3. नंतर एका भांड्यात तेल टाकून फोडणी तयार केली,ह्याकरिता तेल तापले की त्यात मोहरी टाकली, ती तडतडली की जिरं टाकाले.
  4. त्या नंतर लसून टाकावा(बारिक केला तरीही चालेल) आणि टोमॅटो टाकले. .
  5. वरील साहित्य चांगले परतून घेतले
  6. त्यात हळद, मिरची, मिठ आणि मसाला, (घरचा कुठलाही मसाला चविनुसार टाकणे)
  7. शिजलेली दाळ टाकून चांगले एकजीव करावे.हे मिश्रण उकळत ठेवावे.
  8. चिंच-गुळाचा कोळ व कढिपत्ता टाकणे.
  9. एकीकडे दाळीचे मिश्रण उकळ येत असताना कणकेचे गोळे करून ते पोळा प्रमाणे परंतू किंचीत जाड लाटून घेलते. (फार पातळ लाटू नयेत)
  10. पोळीचे सुरीच्या साहाय्याने साधारण २ ईमच ईतके चौकोनी तुकडे करून घेतले.
  11. आणि उकळत्या दाळीत सोडून १० मि. शिजू दिले.
  12. वरून कोथिंबीर टाकून सर्व करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर