मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्य़ानचे कढीगोळे

Photo of Turichya Danyanche Kadhigole by Vaishali Joshi at BetterButter
377
3
0.0(0)
0

तुरीच्या दाण्य़ानचे कढीगोळे

Nov-17-2018
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्य़ानचे कढीगोळे कृती बद्दल

मला अजूनही स्पष्ट आठवत मी पाचवित किंवा सहावीत होते ...आम्ही वडिलांच्या नोकरी निमित्य प्रोजेक्ट वर असायचो त्यामुळे हिवाळ्य़ात दर रविवारी कोणी न कोणी पिकनिक साठी यायचे ...एकदा माझी मामेआज्जि आली होती तिने लगेच तुरीच्या ताज्या शेंगा तोडून त्या दान्यानचे असे हे अप्रतिम चवीचे कढी गोळे केले होते ते आम्ही पहिल्यांदाच खाल्ले होते ..आजही ती चव जिभेवर रेंगाळते .नंतर मात्र आई नेहेमीच करते आणि आता मीही .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. तुरीच्या शेंगांचे दाणे २ कप
  2. आल तुकडा १ इंच
  3. लसुण पाकळ्य़ा ६-७
  4. कोथिंबीर
  5. हिरव्या मिरच्या ३-४
  6. करी पत्ता
  7. जीरे १/२ चमचा
  8. मोहोरी
  9. तिखट आवडीनुसार
  10. हळद
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल २ चमचे
  13. मेथी दाणे ८-१०
  14. हिंग
  15. बेसन २ चमचे
  16. आंबट दही किंवा ताक

सूचना

  1. तुरिचे दाणे , लसुण , आल , जीरे , मिरच्या एकत्र करून मिक्सर मधे बारीक़ वाटुन ठेवा
  2. त्यात मीठ , तिखट आणि कोथिबीर घालून मिक्स करून ठेवा
  3. आंबट दही किंवा ताक आणि बेसन घुसळून ठेवा
  4. कढईत तेल तापत ठेवा
  5. मोहोरी , हिंग ,मेथी दाणे टाकून मिरच्या , करी पत्ता घाला . हळद घालून घोटून ठेवलेले दही आणि बसनाचा घोळ घाला आणि मीठ व लागेल तेवढे पाणी टाकुन कढीला उकळी येउ द्या
  6. उकळत्या कढित तुरी च्या वाटनाचे छोटे छोटे गोळे करून घाला आणि ८-१० मिनिट पाहिले हाय आणि नंतर मीडियम फ्लेम वर शिजू द्या
  7. तयार तुरिच्या दाण्यानचे कढीगोळे आवडीनुसार चपाती , भाकरी किंवा भाता बरोबर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर