मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या काजूची उसळ

Photo of Tender cashews usal by Shraddha Juwatkar at BetterButter
842
4
0.0(0)
0

ओल्या काजूची उसळ

Nov-19-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या काजूची उसळ कृती बद्दल

आम्ही लहान असताना कोकणात गेलो की आमची आजी ही भाजी हमखास करून घालायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे

साहित्य सर्विंग: 6

  1. पाव किलो शेवग्याच्या शेंगा
  2. दोन वाट्या ओले काजूचे गर
  3. हिरवे वाटण: लसूण,आले,हिरव्या मिरच्या व कोथिंबीर
  4. भाजलेले वाटण: एक उभा चिरलेला कांदा थोडे तेल घालून लालसर भाजून घ्यावा व त्यात एक वाटी किसलेले सुके खोबरे घालून भाजून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  5. एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून
  6. फोडणी साठी तेल, जिरे व एक कांदा बारीक चिरून
  7. आवडीनुसार मालवणी मसाला किंवा संडे मसाला
  8. थोडीशी हळद
  9. चवीनुसार मीठ व एक दोन आमसूल

सूचना

  1. शेंगा सोलून मध्यम आकारात ३ ते ४ इंचाचे तुकडे करावे.
  2. काजू रात्रभर पाण्यात घालून ठेवायचे किंवा लगेच हवे असतील तर पाण्यात घालून एक उकळी येऊ देणे
  3. पातेले गॅसवर ठेऊन तेल घालून जिरे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा.
  4. कांदा सोनेरी रंगावर आला की त्यात हिरवे वाटण घालून परतावे.कच्चा वास गेला की मालवणी मसाला व हळदपूड घालून परतावे.
  5. आता त्यात काजूचे गर व शेंगा घालून गरांना आणि शेंगांच्या तुकड्यांना मसाला चिकटू द्यावा.मग त्यात गरम पाणी अंगासरसे घालावे.
  6. एक उकळी आली की,टोमॅटो घालून.खोबऱ्याचे वाटण ,मीठ घालून झाकणी ठेवावी.झाकणीवर पाणी ठेऊन मंद आचेवर शिजवावे
  7. भाजी शिजत आली की, गरम मसाला व आमसूल घालून दोन मिनिटांनी उतरावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर