मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ व तांदूळ ढोकळा

Photo of Dal & tandul dokla by जयश्री जोशी at BetterButter
1819
1
0.0(0)
0

डाळ व तांदूळ ढोकळा

Nov-21-2018
जयश्री जोशी
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ व तांदूळ ढोकळा कृती बद्दल

हा ढोकळा डाळ व तांदूळ एकत्र दळून बनवतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. २वाटी तांदूळ
  2. १वाटी उडीद डाळ
  3. १वाटी चना डाळ
  4. ७,८लसूण पाकळ्या
  5. ५,६हिरव्या मिरच्या
  6. १" आल
  7. फोडणीसाठी साहित्य (मोहरी,जिर, तीळ, हिंग ,तेल)
  8. थोडा कडीपत्ता
  9. किसलेले खोबरे
  10. चवीपुरते मीठ
  11. चवीपुरती साखर
  12. १/२ टी स्पून बेकिंग सोडा
  13. १ टेबल स्पून ताक
  14. ४ टेबलस्पून तेल

सूचना

  1. प्रथम डाळ व तांदूळ गिरणीतून रवाळ असे दळून आणणे
  2. ते रात्री कोमट पाण्यात ताक घालून भिजवून ठेवणे (सरबरीत असे)
  3. चांगले फुगून आल्यानंतर त्यात करतेवेळी आल, लसूण मिरचीचे वाटण घालणें
  4. २टेबलस्पून तेल ,मीठ व साखर घालून १ बाजूने चांगले फेटून घेणे (तेल गरम न करताच घालने)
  5. नंतर ढोकळा पात्र पाणी टाकून व त्यावर ढोकळा डिश ठेवून त्याला तेल लावून घेणे व ते गरम करण्यास ठेवणे
  6. १डिश मध्ये बसेल एव्हढेच वेगळ्या भांड्यात ढोकळा बेटर घेवून त्यात थोडा बेकिंग सोडा घालून चांगले फेटून मग दिशमध्ये ओतणे
  7. १०मी.ढोकळा चांगला फुगून येतो
  8. सर्व ढोकळे बनवून झाल्यावर त्याला आकारात कापणे
  9. मग मोठी कढई घेवून त्यात तेल टाकून चांगला तडका तयार करून त्यात ढोकळा घालून व वरून खोबरे व कोथिंबीर घालून सर्व करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर