मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापुरी भरलं वांग

Photo of Kolhapuri Bharal Vang by Sanjay Patil at BetterButter
2671
2
0.0(0)
0

कोल्हापुरी भरलं वांग

Nov-22-2018
Sanjay Patil
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापुरी भरलं वांग कृती बद्दल

आमच्या लहानपणी आज्जी सगळे मसाले पाट्या वरवंट्यावर वाटायची व तो मसाला वापरुन केलेली भाजी इतकी अप्रतिम सांगायची की बोलायच काम नाही... असेच पाटा वरवंट्यावर मसाला वाटुन तयार केलेली भरली वांगी..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १० छोटी वांगी
  2. १ वाटी ओले खोबरे
  3. १/२ वाटी शेंगदाण्याचे कुट
  4. १/२ वाटी कांदा-लसुन चटणी
  5. १/२ वाटी कोथिंबीर
  6. ३ चमचे तीळ व खसखस
  7. १/४ वाटी तेल
  8. चवीप्रमाणे मीठ

सूचना

  1. प्रथम जीरे व तीळ खसखस तव्यावर भाजून घ्या
  2. खोबरे व कोथिंबीर व हे भाजलेले मिश्रण एकत्र करुन पाट्यांवर वाटुन बारीक करुन घ्या.
  3. त्यानंतर एका कढईत तेल घाला व त्यात हे वाटलेले मिश्रण चांगले परतुन घ्या
  4. त्यानंतर त्यात कुट व चटणी घालुन परता. मिठ घाला. मिश्रण कोरडे वाटत असल्यास थोडे पाणी घाला व थोडावेळ वास सुटेपर्यंत परता व हे मिश्रण काढुन घ्या.
  5. आता वांगी धुवुन घेवुन प्रत्येक वांग्याला चारी बाजुने चाकुने थोडे काप द्या व त्यात हे तयार मिश्रण भरुन घ्या.
  6. दरम्यान एका मोठ्या पातेल्यात पाणी घेवुन चुलींवर ठेवुन द्या त्यांवर मोदकपात्राची चाळण ठेवा व त्यात ही मसाला भरलेली वांगी ठेवा व १० ते १२ मिनिट शिजु द्या
  7. वांगी चांगली शिजलेत अशी वाटल्यावर काढुन घ्या. थोडी गार झाल्यावर कढईत थोडे तेल घाला त्यात जीरे मोहरी तिखटाची फोडणी करुन त्यात वांगी परतुन घ्या
  8. ज्वारीची भाकरी, दही, कांदा यांच्याबरोबर सर्व्ह करा....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर