मुख्यपृष्ठ / पाककृती / मटण सूप

Photo of Meat soup by SUCHITA WADEKAR at BetterButter
38
1
0.0(0)
0

मटण सूप

Nov-25-2018
SUCHITA WADEKAR
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण सूप कृती बद्दल

माझी आजी चुलीवरील मटण खूप भारी करायची. मटण चुलीवर शिजत असताना खूप घमघमाट सुटायचा. मटण शिजले की आजी आम्हा मुलांना वाटीत मटणाचा पिवळा रस्सा, कलेजी आणि गुडदा खायला द्यायची आणि आई त्यासोबत गरम गरम भात द्यायची. रविवारचा सकाळचा हाच आमचा नाष्टा असायचा. आज बऱ्याच दिवसांनी मटण बनवले आणि आजीची आठवण झाली. त्यावेळी आता सारखे गॅस, कुकर मिक्सर नव्हते. चूल हाच गॅस, पातेलं हाच कुकर आणि पता वरवंटा हाच मिक्सर असायचा. आज तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे मटणाचा पिवळा रस्सा म्हणजे मटण सूप ची रेसिपी. हे सूप खूप पौष्टीकही असते. त्यावेळी चुलीवर मटण शिजायला कमीत कमी एक तास लागायचा परंतु आता कुकरमध्ये तीन शिट्ट्या मध्ये पटकन शिजते.... मटण सूप !

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. मटण अर्धा किलो
 2. मध्यम आकाराचे 2 कांदे
 3. हिंग 2 टी स्पून
 4. हळद 3 टी स्पून
 5. मीठ आवश्यकतेनुसार
 6. तेल 6 टेबल स्पून
 7. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

 1. मटण स्वच्छ धुऊन घ्यावे
 2. कांदा बारीक चिरून घ्यावा.
 3. गॅसवर एका पातेल्यामध्ये तेल तापत ठेवावे.
 4. त्यामध्ये हिंग, हळद व कांदा घालून चांगले परतावे.
 5. यामध्ये स्वच्छ धुतलेले मटण घालून चांगले परतावे व दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
 6. दोन मिनिटांनी त्यात मीठ घालावे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवावे व त्या झाकणावरदेखील पाणी ठेवावे आणि गॅस बारीक करावा.
 7. पाऊण तामिनिटांनी मटण शिजले का ते चेक करावे. मटण शिजले असेल तर गॅस बंद करावा आणि अजून शिजायचे असल्यास पुन्हा दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
 8. दहा मिनिटांनी झाकण उघडावे आणि सर्व्ह करावे मटण सूप !
 9. आपले मटण सूप तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर