मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे कानवले

Photo of Methiche  kanvale by Pranali Deshmukh at BetterButter
744
2
0.0(0)
0

मेथीचे कानवले

Nov-25-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे कानवले कृती बद्दल

लहानपणी मला अजिबात मेथी आवडत नव्हती , पण एक दिवस आजीनी एक आगळा वेगळा खूप चविष्ट पदार्थ बनवला इतका आकर्षक दिसत असल्यामुळे मी काहीच न विचारता अगदी मस्त ताव मारला आणि मला टिफिनमध्ये पण दे असं आजीला सांगितलं . खाऊन झाल्यावर आजीला विचारलं ," काय बनवलं होतं गं तू आज , तिने गालातल्या गालात हसून उत्तर दिलं , मेथीचे कानवले आणि बस त्यादिवशीपासून मेथी माझी प्रिय झाली .मेथी खूप गुणकारी आहे मुलं मात्र खाण्याचा कंटाळा करतात मग मी असेच हेल्दी आणि रुचकर कानवले बनवून देते . माझ्या आजीने बनवलेला प्रत्येक पदार्थ खूप आवडतो मला अन्नपूर्णाच ती त्यातला हा एक .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2 कि मेथी
  2. 1 वाटी कणीक
  3. 1 कांदा
  4. 1 टमाटर
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 2लसूण पाकळ्या 1 tbs जिरं
  7. तेल 2 tbs
  8. तिखट 1 tbs
  9. हळद 1/2 tbs
  10. मीठ

सूचना

  1. मेथी निवडून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या
  2. कणिक घ्या त्यामध्ये मीठ आणि 1 वाटीभर मेथी हातानी तोडून मिक्स करा
  3. आता हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. कढईत तेल टाका तेल तापलं कि जिरं लसूण मिरची कांदा टाका
  5. तिखट हळद मीठ आणि टमाटर टाका
  6. आता बाकीची मेथी हातांनीच तोडून टाका कारण अशाप्रकारे कडवटपणा येत नाही
  7. 1 कप पाणी घालून झाकण ठेवा
  8. आता पीठ चुरून घ्या छोटासा उंडा घेऊन खूप पातळ पोळी लाटा
  9. पूर्ण पोळीला तेल लावा आणि दुमट मारा
  10. परत तेल लावा आणि जशी घडीची पोळी फोल्ड करतो अशाप्राकारे करा
  11. आता वाफ आलेल्या भाजीमध्ये हे कानवले सोडा आणि झाकण ठेवा 6-7 मिनिट झाल्यावर परतवा आणि परत 3-4 मिनिट होऊ द्या
  12. जर रस्सा आवडत असेल तर थोडं पाणी असताना गॅस बंद करा नाहीतर पाणी आटल्यावर बंद करा.
  13. मेथीचे कानवले रेडी अशाप्रकारे भरपूर प्रमाणात मेथी मुलांना देऊ शकतो शिवाय आपणही अगदी झटपट बनवू शकतो .
  14. 1

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर