मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळगुळाच्या कोसल्या

Photo of Tilgulachya Koslya by Vaishali Joshi at BetterButter
896
6
0.0(0)
0

तिळगुळाच्या कोसल्या

Nov-28-2018
Vaishali Joshi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळगुळाच्या कोसल्या कृती बद्दल

आजीच्या हातचा मला सर्वात प्रिय असा गोड पदार्थ 'कोसल्या ' तिळ आणि गुळ या पासून बनविलेल्या अप्रतिम चवीच्या कोसल्या मकरसंक्रांतिला हमखास करतात .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळा चे पीठ १ कप
  2. तिळ ३/४ कप
  3. गुळ १ कप
  4. बेसन २ टी स्पून ( थोड्या तेलात भाजून घ्यावे )
  5. वेलची पावडर १/४ चमचा
  6. साजुक तूप
  7. तेल १ चमचा
  8. पाणी ११/२ कप

सूचना

  1. तिळ भाजून जाडसर कूट करून त्यात पातळ केलेला गुळ ( कुकर लावताना वरण भाता सोबत सगळ्यात वर एक पसरट भांड्यात गुळ ठेवून झाकून कुकर मधे ठेवला की छान सरसरीत होउन तो थंड झाल्यावर मऊ होतो ) , २ चमचे भाजलेले अख्हे तिळ ,बेसन आणि वेलची पुड घालून हाताने एकजीव करून सारण बनवून ठेवा
  2. गैस वर ११/२कप पाणी उकळत ठेवा ते उकळल्यावर त्यात १ चमचा तेल आणि चिमुटभर मीठ घालून तांदुळा ची पीठी घालून मिक्स करा व १० मिनिट झाकून ठेवून उकड काढून घ्या
  3. उकड़ थोड़ी थंड झाल्यावर तेल व पाण्य़ाच्या हाताने अगदी मऊ मळून घ्या आणि छोटे छोटे गोळे करून घ्या
  4. एक एक गोळा घेवून छोट्या पोळी एवढे लाटून घ्या आणि त्यात मधोमध सारण टाकुन करंजी सारख दुमडून घ्या व कड़ा पाण्या चा हात लावून चिपकवून घ्या आणि हाताने थोड प्रेस करून चापट करून घ्या
  5. गैस वर एक पातेल्यात पाणी टाका व् भांडयाचे वर पांढरे मलमल चे कापड बांधून घ्या आणि पाणी उकळायला लागल्यावर कपड्यावर एका वेळी दोन कोसल्या ठेवा आणि दोन्ही बाजूने वाफवून घ्या . तुम्ही चाळणी वर सुद्धा वाफवू शकता .
  6. काढून घ्या , अशाच प्रकारे सर्व कोसल्या करून घ्या
  7. गरमागरम कोसल्या वरून साजुक तूप घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर