मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी मटण रस्सा.

Photo of Khandeshi Mutton Rassa. by Triveni Patil at BetterButter
2951
1
0.0(0)
0

खान्देशी मटण रस्सा.

Dec-02-2018
Triveni Patil
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी मटण रस्सा. कृती बद्दल

मटण रस्सा खावा तर गावात तो पण आजीच्या हातुन आजही ती चव नाही विसरता येत, आज आजी तर नाही पण तिच्या हातची चव ईथे उतरवीन्याचा हा छोटासा प्रयत्न. माझी आजी पक्की सुगरण होती त्यामुळे आई पण सुगरण च आहे, मी त्यांच्या पायावर पाय ठेवुन चालायचा प्रयत्न करत आहे पण अजुन शिकवण चालु आहे म्हणायला हरकत नाही, खान्देशी मटण रस्सा भरपुर कांदे आणी खडा मसाल घालुन केली जाते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. १. मटन अर्धा किलो.
  2. २.४ मध्यम आकाराचे व १ मोठा कांदा बारिक
  3. ३.लसणाच्या पाकळ्या - १८/२०.
  4. ४.आलं - १ इंच.
  5. ५. सुकं खोबरं - २ टे.स्पुन ( Optional ).
  6. ६. ४ लवंगा.
  7. ७.४ काळी मिरी.
  8. ८. अर्धा इंच दालचिनीचे २ तुकडे.
  9. ९.१ टे. स्पुन खसखस.
  10. १०.२ तेजपान.
  11. ११. ४ हिरवी वेलची.
  12. १२.२/३ काजु.
  13. १३. मटण मसाला १. टे.स्पुन
  14. १४.लाल तिखट - २ टे..स्पुन.
  15. १५.१ टि.स्पुन जीरे.
  16. १६. तेल.
  17. १७. हळद एक टि.स्पुन.
  18. १८. अर्धा जुडी कोथिंबीर.
  19. १९.मीठ चवी पुरते.

सूचना

  1. १. अर्धा जुडी काड्यां सकट कोथिंबीर धुऊन साफ केलेली, अर्धा इंच आलं , ४/५ लसुन पाकळ्या मिक्सर मधुन बारिक प्युरी करुन साईडला ठेवा.
  2. वाटण :-
  3. १. ४ कांदे घेवुन पापड भाजायच्या जाळीवर ठेवुन डायरेक्ट गँसवर ठेवुन काळपट होईस्तोवर भाजुन घ्या, कांदे भाजले गेले की एका प्लेट मध्ये काढुन गरम तव्यावर लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडे टाकुन परतुन घ्या. मग हिरवी वेलची, व तेजपत्ता भाजुन भाजलेल्या कांद्या सोबत ठेवा, त्याच तव्यावर काजुचे तकडे व खसखस भाजुन, कांद्याच्या प्लेट मध्ये टाका, भाजलेल्या कांद्या मध्ये लसुनाच्या १८/२० पाकळ्या, १ इंच आलं बारीक तुकडे करुन टाकुन मिक्सर मध्ये बारिक वाटण करा या वाटणा मध्येच लाल तिखट, व मटण मसाला व थोडं पाणी घालून बारिक वाटण करा.
  4. २. खोबर्याचे काप करुन किंवा किसुन तव्यावर गोल्डन रंगावर भाजून घ्या जास्त जाळु नका नाहितर कडसळ लागते. भाजलेल खोबरं पाणी टाकून वाटण करुन घ्या.
  5. मुख्य कृती :-
  6. १. मटन स्वच्छ धुवुन घ्यावं.
  7. २. कुकरमध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. १ बारिक कापलेला कांदा टाकुन परतावा.
  8. ३. कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्या.
  9. ४. थोडी हळद घालुन मिनिट्भर परतावं.
  10. ५. मग त्यात धुतलेलं मटन घालुन ते ३/४ मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला. व अगोदर करुन ठेवलेली कोथिंबीर लसुन आलं प्युरी मधिल २/३ चमचे प्युरी घालुन २/३ मिनिट परतवुन घ्या, खुप छान असा सुगंध येतो.
  11. ६. कुकर मध्ये मटन बुडेल व थोडं वर राहिल ईतके पाणी घालुन कुकरचं झाकण लावुन ४ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर मटन शिजलेलं असेल आणि त्यात टेस्टी असं सुप ( उकड ) पण तयार झालं असेल.
  12. ७. आता पितळी पातेल्या मध्ये ५/६ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला.
  13. ८. नंतर कांदा लसनाचे खड्या मसाल्याचे वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात २ टे.स्पुन खोबर्याची पेस्ट व २ चमचे कोथिंबीर प्युरी घालुन परत ५/१० मिनिट परता, मग कांद्याचे वाटण केलेले भांडे पाण्याने धुवुन ते पाणी मसाल्यात घाला, व परत मसाला परतुन ५/७ मिनिट झाकुन ठेवा.
  14. ९. आता पातेल्या वरिल झाकन उघडुन बघितल तर छान तर्री आलेली दिसेल मग ह्यात कुकर मधले मटन पिस घालुन ३/४ मिनिट परता व परत १० मिनिट झाकुन ठेवा.१० मिनटां नंतर झाकन काढुन उकड घाला, करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात उकड घाला जास्त पातळ हवी असेल तर थोडे पाणी गरम करुन घाला.
  15. १०. चवी प्रमाणे मीठ घाला, उकळी आली की बारिक कापलेली कोथिंबीर घाला.
  16. ११. उकळी आल्यावर अजुन १०-१२ मिनिटं मंद आचेवर उकळुन घ्या. मग मटण रस्सा तयार.
  17. तयार मटण रस्सा.
  18. १२. बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह करा. सोबत पापड सलाड आहेच.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर