मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीची खिचडी

Photo of BAJRICHI Khichadi by Rohini Malwade at BetterButter
19
2
0.0(0)
0

बाजरीची खिचडी

Dec-03-2018
Rohini Malwade
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीची खिचडी कृती बद्दल

हिवाळ्यात शरीरात ऊब निर्माण करणारी आणि तितकीच पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. बाजरी 1 वाटी
 2. तांदूळ 1/4वाटी
 3. हिरव्या मिरच्या 5 बारीक चिरून
 4. कडीपत्ता
 5. कोथिंबीर
 6. 1 टोमॅटो बारीक चिरून
 7. 1 कांदा बारीक चिरून
 8. 1 बटाटा बारीक चिरून
 9. हळद
 10. मीठ
 11. तेल
 12. जिरे मोहरी
 13. अद्रक लसूण पेस्ट 1 टेबलस्पून
 14. तूप 1 चमचा

सूचना

 1. 1 -बाजरी 4 तास भिजून घ्यावी किंवा रात्रभर भिजवली तरी चालेल.
 2. 2 - नंतर बाजरी पाण्यातून काडून मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्यावी जास्त बारीक करू नये.
 3. 3- तांदूळ पण स्वच्छ धुवून घ्यावेत.
 4. 4 - गॅस वर कुकर ठेवून त्यात 2 चमचे तेल घालून गरम करावे.
 5. 5 - त्यात जिरे, मोहरी घालून तडतडून घ्यावी नंतर कडीपत्ता, हिरवी मिरची,आलं लसूण पेस्ट आणि कांदा घालून छान तळून घ्यावा.
 6. 6 -नंतर त्यात बटाटा, टोमॅटो, हळद आणि कोथिंबीर घालावी.
 7. 7- मिक्सरमध्ये बारीक केलेली बाजरी, आणि तांदूळ घालून 3 मिनिट छान परतून घ्यावे.
 8. 8- आता 3 1/2 वाट्या गरम पाणी घालून मिक्स करावे.
 9. 9- मीठ आणि वरून थोडी कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि कमी गॅसवर कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्याव्यात.
 10. 10- कुकर थंड झाल्यावर झाकण काढून मिक्स करावे व वरून साजूक तूप घालून खावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर